जेष्ठ समाजसेवक ओंकारआप्पा तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

१४ रूग्णालयांमध्ये आयोजित शिबिरांचा शेकडो रूग्णांनी घेतला लाभ

खामगाव ः राजमाता, राष्ट्रमाता मॉ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच तानाजी व्यायाम शाळेचे सचिव, हरे हरे नवरात्रोत्सव मंडळाचे आधारस्तंभ, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, जेष्ठ समाजसेवक ओंकारआप्पा तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१२ जानेवारी रोजी नागरिकांसाठी निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील १२ रूग्णालय व दोन पॅथालॉजीमध्ये आयोजित या शिबिराचा जवळपास ६०० चे वर रूग्णांनी लाभ घेतला.

           या शिबिरामध्ये दमा, अस्थमा, श्वसनाचे विकार, व्यंधत्व चिकित्सा, डोळ्यासंबंधी समस्या, हाडांचे विकार, दात व हिरड्या संबंधी समस्या, हृदयरोग व मधुमेह, सर्दी खोकला, लहान मुलांचे आजार, महिला संबंधी आजार यासह विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी करून सेवा दिली. या निःशुल्क शिबिरामध्ये सर्व प्रकारचे रक्त, लघवी तपासणी, ईसीजी, बीपी,  पीएफटी, बीएमडी तपासणी मोफत करण्यात आली तसेच एक्स - रे तपासणी व सोनोग्राफी यावर ५०% सुट देण्यात येवून सर्व गरजू रुग्णांना मोफत औषधी व दम्याच्या रुग्णांना स्प्रे पंप सुध्दा मोफत वितरीत करण्यात आले

. यावेळी डॉ. गणेश महाले, डॉ. संजीव राठोड, डॉ. गुरुप्रसाद थेटे, डॉ. प्रशांत शंखपाल, डॉ. गोविंद अग्रवाल, डॉ. रूपाली थेटे, डॉ. दिपीका शंखपाल, डॉ. रविशंकर जाधव, डॉ. नरेंद्रसिंग पवार, डॉ.  राहुल खंडारे, डॉ. निलेश पांढरे, डॉ. चेतन सायोटो, डॉ. नितेश अग्रवाल, डॉ. गौरव राठोड, डॉ. प्रतीक सुरूसे, डॉ. दिपाली सुरुसे, डॉ.शारदा अग्रवाल,  विलास महाले, डॉ. रंजना महाले,  स्वप्नील दांडगे व सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.निलेश टापरे यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय चमूने सेवा दिली. शिबिराला रूग्णांचा मिळालेला प्रतिसाद पाहता डॉक्टरांनी उशिरापर्यंत सेवा देवून शिबिर यशस्वीरित्या पार पाडले. शिबिराप्रसंगी सर्व सेवा देणारे डॉक्टर तसेच सामान्य रुग्णालय मधील लॅबचे अधिकारी व कर्माचारी यांचे तोडकर मित्र परीवार तर्फे शाल, श्रीफळ देवून स्वागत सत्कार करण्यात आले.

 शिबिरासाठी सुरेश घाडगे, संजय घोगरे, शाम आंबेकर, किशोर गरड, सुर्यकांत तोडकर, राजेश अवचार, अरविंद मुळीक, राकेश राणा, राम मिश्रा, कृष्णासिंह ठाकूर, गणेश सोनोने, पवन गरड, संभाजीराव टाले, मुबारक खान, नितेश मानकर, संतोष करे, रितेश बोरे, अतुल सुकाळे बाळु देशमुख,सतीश गवळी, संदीप राजपूत, रवी गायगोल, पवन राठोड, प्रसाद एैदलाबादकर, योगेश आळशी, भावेंद्र दुबे, आदित्य जोशी, अक्षय म्हस्के, विक्की चौधरी, शुभम देशमुख, निखिल घाडगे, अभय ज्योत, राहुल भाटिया, दिलज्योत सिंग संधू, निकुंज मंधानी, राहुल पारखे, शाम गायकवाड, शक्ती ओझा, सुनिल देशमुख, आकाश तोडकर, विजय खंडागळे, ओम पाडोळे, सुनील सातपुते, अमित बोरा, प्रणव माने, हर्षल काळे, आनंद घाडगे, वैभव काळे, भावेश शेगोकार, रोहित भोसले, संकेत मुळीक, संकेत बागाडे, सुमित तोडकर, सचिन बगाडे, अभय ज्योध, सौ. कविता सुकाळे, सौ. ज्योती माने, प्रियंका राऊत, ऋषाली लेकुरवाळे, भुमी चव्हान, शिवानी सुकाळे व असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून परिश्रम घेतले.



Post a Comment

Previous Post Next Post