क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती  निमित्त क्रीडा सप्ताह चे आयोजन

 अंत्रज: श्री सरस्वती इंग्लिश स्कूल अंत्रज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून संस्थेच्या संचालिका सौ.भाग्यश्री चोपडे मॅम उद्घाटन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे महत्त्व सांगितले.तसेच संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ. काळबांदे मॅडम यांनी शिक्षणासोबतच खेळांचे महत्त्व सांगून संस्थेच्या वतीने क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रीडा सप्ताह चे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांतजी चोपडे सर यांच्या हस्ते करण्यात आले 

यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कबड्डी स्पर्धा, जुडो कराटे, लांब उडी, खो-खो, तर छोट्या मुलांसाठी लिंबू चमचा, बुक बॅलन्स  इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले  सदर स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक ठाकरे सर, निमकाडे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले तर शैलेश गिरी सर, शिक्षिका अर्चना महाले , बोचरे मॅम ,सरप मॅम, घाटे मॅम, इंगोले मॅम, बेलोकार मॅम, कर्मचारी शुभम खेडकर, सहदेव वाघ, हिंगणकारताई यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post