शेतीच्या वादातून खून प्रकरण.....

सात जणांना जन्मठेप- न्या. एस. एन. माने-गाडेकर यांचा निर्वाळा

हिंगोली जनोपचार न्यूज नेटवर्क :- तालुक्यातील राहोली बुद्रूक येथे शेतीच्या वादातून तरूणाचा खून केल्याच्या आरोपावरून सात जणांना जन्मठेप व सात लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. माने-गाडेकर यांनी शुक्रवारी दिला.

राहोली बुद्रुक येथील शंकर डोरले (३०) यांचा गावातील रमेश डोरले याच्यासोबत शेतीचा वाद होता. २१ मे २०१९ रोजी दुपारी वाद वाढल्यानंतर ७ जणांनी शंकर यांचा कुन्हाडीने वार करत खून केला. या प्रकरणी लक्ष्मण डोरले यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रमेश डोरले, विठ्ठल घोंगडे, आंबादास डोरले, रामकिसन डोरले, नामदेव घोंगडे, ज्ञानेश्वर बोरगड, मारोती डोरले यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक अंगद सुडके, जमादार अशोक धामणे यांच्या पथकाने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. डी. कुटे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. एन. एस. मुटकुळे, अॅड. एस. एस. देशमुख, जमादार नंदकिशोर जाधव, पी. बी. धुर्वे यांनी युक्तिवादासाठी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post