त्या अडत दुकानदाराचे लायसन रद्द करण्याची मनसेची मागणी
शेतकऱ्याची लूट करणाऱ्या अडत्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा-अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
खामगांव:- दि. १० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान खामगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सावता अडत या परवाना धारकांकडून शेतमालाची विक्री करणाच्या शेतक्यांच्या प्रति क्किंटल तुरीच्या मागे सात ते आठ किलो तुरी ची मोजमाप करताना हेराफेरीकरून शेतकर्यांना लुबाडण्याचा गोरख धंदा केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी महाळंगी, ता.नांदुरा येथील शेतकरी बाबुराव इंगळे यांनी खामगांव बाजार समितीमध्ये ४० क्विंटल तुरसावता ट्रेंड्स खामगांव येथे विक्री करीता आणली होती याच ठिकाणी मोजमाप करतांना क्रिंटल मागे ८ किलो तुर जास्त काढल्या जात असल्याचा प्रकार शेतकरी इंगळे यांनी उघड़कीस आणला होता. या संदर्भात काही काळापुरते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकन्यांनी एकत्र येत रोष सुद्धा व्यक्त केला होता तसेच शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव कार्यालयात सुद्धा येऊन सदर अडत्यावर कार्यवाही
करण्यासंदर्भात शेतकन्यांनी आपली भेट सुद्धा घेतली होती. तरीसुद्धा आपण अद्यापही
सावता अडत नामक अडत दुकानदारा विरोधात कुठलीही कार्यवाही केली नाही. तरी
आपण त्वरित सदर सावता अडत दुकानदाराचा परवाना रह्द करावा तसेच त्या दुकानदारा विरोधात खामगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्ार करून सदर अड़त्यावर त्वरित गुन्हे दाखल
करण्यासंदर्भात पोलीस विभागाशी पत्रव्यवहार करुन गुन्हे दाखल होईपर्यत पुढाकार घ्यावा.सदर अडत्यामुळे बाजार समितीची प्रतिमा मलीन झाली असून याकरीताच सदर
अडत्यावर त्वरीत कार्यवाही करून त्याचा परवाना रह्द करावा जेणे कून शेतकन्यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव यांच्यावर कायम विश्वास राहील. आतापर्यंत या अडत्याकडून अनेकशेतकन्यांचाशेतमाल घेतांना मोजमाप मध्ये हेराफेरी केल्याची दबक्या आवाजात चर्चा झाली होती तरी आपण त्वरित या अडत्याचा परवाना रद्द करावा तसेच या अडत्याच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीला नवीन परवाना देण्यात येऊ नये. तसेच सावता अडत दुकानदारांवर बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीवर बंदी घालावी . बाजार समितीमध्ये सावता अडत दुकानदाराला प्रवेश देण्यात येऊ नये असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना खामगाव शहर व तालुका च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव यांना देण्यात आले यावेळी उपस्थित शहराध्यक्ष आनंद गायगोळ, शहरउपाध्यक्ष आकाश पाटील, तालुका उपाध्यक्ष सागर भोपळे शहर उपाध्यक्ष डॉ.अभिजीत महानकार सागर हरसुले नरेंद्र मस्के करण दीक्षित यासह आदी पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment