जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षपदी शिवमती सिमाताई ठाकरे यांची नियुक्ती
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क:- जिजाऊ ब्रिगेडच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी शिवमती सिमाताई ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 12 जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवात मातृत्व सिंदखेड राजा येथे ही निवड जाहीर करण्यात आली.
शिवमती सिमाताई ठाकरे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्या, बुलढाणा जिल्हा सहकारी दूध उत्पादक सदस्या म्हणून काम केले आहे. महिलांचा विकास तसेच महिला सक्षमीकरणासाठी सीमाताई ठाकरे वर्षभर विविध कार्यक्रम घेत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती सीमाताई बोके, शिवमती उर्मिला ताई हाडे , लता ताई साबळे ,शारदा ताई बावने, प्रिया ताई हराळे , आंतरराष्ट्रीय महासचिव वनिता ताई अरबट, माजी जिल्हाध्यक्ष रंजनाताई घिवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शिवमती सिमाताई ठाकरे यांना बुलढाणा जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रतिमा देशमुख, संगीता खरस ने , संगीता वाघ, सुधा भिसे, निश्चल इंगळे, अर्चना ठाकरे, कु कोमल वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
Post a Comment