खामगाव तेली समाज महिला मंडळाचा नाविन्यपूर्ण हळदी कुंकवाचा कार्यक्रम
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- श्री संताजी महाराज सभागृह येथे तेली समाज महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेविका विमलताई बोरे माजी अध्यक्ष सीमाताई भिसे महिला मंडळ अध्यक्ष नंदाताई सोनटक्के जी अध्यक्ष सुलोचना सुलताने कार्यक्रमाचे उद्घाटक विमलताई गोतमारे व कल्पनाताई वसंतकार (अध्यक्ष) धनगर समाज महिला मंडळ यांच्या हस्ते संताजी महाराजांच्या फोटोला हार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले
या कार्यक्रमाचे नाविन्य म्हणजे तेली समाज महिला मंडळाने आपल्या समाजातील महिलांसोबत इतर समाजातील म्हणजे देशमुख समाज महिला मंडळ, अखिल भारतीय मराठा महासंघ महिला मंडळ, टिळक स्मारक महिला मंडळ, जिजाऊ ब्रिगेड महिला मंडळ ,कुणबी समाज महिला मंडळ, धनगर समाज महिला मंडळ, शिंपी समाज महिला मंडळ ,वाणी समाज महिला मंडळ, यांना सुद्धा आमंत्रित करून त्यांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा तेली समाज महिला मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवून झटणाऱ्या माजी जि प सदस्य सीमाताई ठाकरे यांची जिजाऊ ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तेली समाज महिला मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला तसेच (अनिष्ट चालीरीतीला फाटा देत विधवा महिलांना हळदी कुंकू लावून वान देण्यात आले) सर्व जातीय आगळा वेगळा नाविन्यपूर्ण असा हळदी कुंकवा चा कार्यक्रम तेली समाज महिला मंडळाने रजत नगरीत घडवून आणला.
सर्व महिला मंडळांनी उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला त्याबद्दल तेली समाज महिला मंडळ आणि त्यांचे आभार मानले तसेच तेली समाजातील महिला भगिनींनी 300 महिला भगिनी उपस्थिती दर्शविली महिला भगिनींनी एकमेकींना हळदीकुंकू व तिळगुळ देऊन उखाणे घेऊन हा पारंपारिक सोडा पार पडला
कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी पुष्पा जावरे, अंजली सोनटक्के ,संजना जामोदे प्रतिभा सोनटक्के, नंदा फाटे ,स्मिता भिसे, अर्चना जामोदे वैशाली जुमडे, राधिका गोतमारे अँड आशा भागवत शारदा गलवाडे, रश्मी गलवाडे ,रूपाली गोतमारे ,प्रगती सोनटक्के,राधिका बोरे ,शारदा खेडकर, प्रीती अकोटकार, जयश्री हरसुले, सरला शिरसोले ,अमृता चौधरी, शितल खापट ,हर्ष मनसुटे,नयना पांडव ,रेखा राऊत, विद्या सोनटक्के, उर्मिला बेलोकार आदी महिलांनी अर्थ परिश्रम घेतले
Post a Comment