बुलढाणा जिल्हा 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025 गुंजकर कॉलेज, आवार मध्ये
आज दिनांक 4 जानेवारी 2025 ला माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक जि. प. बुलढाणा यांच्या कार्यालयामध्ये माननीय शिक्षण अधिकारी श्री अनिल अकाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप शिक्षणं अधिकारी श्री वाघ साहेब, आणि श्री गायकवाड साहेब,गट शिक्षण अधिकारी , पंचायत समिती, खामगावआणि बुलडाणा जिल्हा विज्ञान शिक्षक संघटना अध्यक्ष श्री संजय जारे सर खामगाव , सचिव श्री खाचने सर यांचे उपस्थितीत प्रदर्शनासंबंधी नियोजन सभा पार पडली.यावर्षीचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन *जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आणि गुंजकर सायन्स,कॉमर्स व आर्ट कॉलेज आवार, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा* येथे दिनांक 9 जानेवारी व 10 जानेवारी 2025 या दिवशी सकाळी 9 ते 5 या वेळेत आयोजित करण्याचे ठरले आहे. कार्यक्रमाला उदघाटक म्हणून *नामदार श्री.प्रतापराव जाधव ,केंद्रीय आयुष मंत्री , भारत सरकार* आणि बक्षिस वितरण आणि समारोप कार्यक्रमाला *नामदार श्री आकाश दादा फुंडकर, कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य* असणार आहेत तरी जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर क्रमांक प्राप्त विध्यार्थी,शिक्षक, प्र. परिचर यांनी मार्गदर्शक शिक्षक सह उपस्थित राहावे. जिल्ह्यातील सर्व गणित व विज्ञान शिक्षक तसेच बुलडाणा जिल्हा विज्ञान शिक्षक संघटने चे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. तसेच 9 जानेवारी 2025 ला एक दिवसीय जिल्ह्यातील सर्व गणित व विज्ञान शिक्षकांचे कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व विज्ञान शिक्षकांनी या कार्यशाळेला उपस्थित रहावे.
आयोजक:-
1) शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा
2) बुलढाणा जिल्हा विज्ञान शिक्षक संघटना,बुलढाणा
Post a Comment