महिला स्वयंसहायता बचत गट, CRP कडून नामदार आकाश फुंडकर यांचे स्वागत
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- खामगाव चे आमदार आकाश फुंडकर यांचे कामगार मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर प्रथमच ते खामगावात आले. दरम्यान त्यांचे ठिकठिकणी जंगी स्वागत करण्यात आले. नगरपरिषद बचत गटाच्या महिलांनी देखील त्यांना औक्षण करून त्यांचा सत्कार व स्वागत केले यावेळी सरला शिरसोले ,सारिका कुंटे, वनिता मानकर,नंदा सुरडकर,सुनीता शिंदे,रेखा कासारे,लक्ष्मी भगत,मीनाक्षी वानखेडे,सविता इंगळे,सुनीता चीपडे,निता धुळे, विशाखा देशमुख सीआरपी व बचत गटातील महिला यांनी स्वागत केले. यावेळी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान,नगर परिषद खामगाव अंतर्गत सारथी शहर स्तर संघ, उपस्थित होते. यावेळी प्रकल्प प्रमुख राजेश झनके,निलेश पारस्कर, भागवत सुतवणे यांनी मार्गदर्शन केले.
Post a Comment