खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत करण्याबाबत कामगार मंत्री मा.नामदार आकाश दादा फुंडकर यांना  अभाविप चे निवेदन

वर्तमान मध्ये ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कामगारांचे पाल्य प्राथमिक माध्यमिक व उच्च शिक्षणाकरिता खामगाव शहरात मोठ्या प्रमाणात येतात हा पालक वर्ग काय आपल्या पाल्यांच्या भविष्याकरिता जागरूक आहे आपल्या कष्टाच्या पैशाने  तो आपल्या पाल्यांना शिक्षणाकरिता शहरांमध्ये  पाठवतो मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाकरिता बसची पास सुद्धा मोफत आहे परंतु बसची संख्या कमी आहे व तसेच बस फेऱ्याची वेळेवर येजा होत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी वेळेवर शाळेत महाविद्यालय मध्ये पोहोचत नाही त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून घरी सुद्धा विद्यार्थी उशिरा पोहोचतो व पालक वर्ग सुद्धा आपल्या पाल्यांच्या चिंतेत राहतो.विद्यार्थ्यांच्या महाविद्यालय सुरू व बंद होण्याच्या वेळेचा आढावा घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांना बस फेऱ्याची उपलब्धता करून द्यावी.

तसेच आगार प्रमुख यांना निवेदन देऊन बस फेऱ्या बद्दल माहिती घेऊन बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले त्याचबरोबर या निवेदनाची प्रतिलिपी माननीय नामदार आकाश दादा फुंडकर यांना सुद्धा निवेदन दिले असता माननीय मंत्री महोदयांनी बस सेवा सुरळीत करण्याचे त्यांनी आश्वासन दिलेले आहे ही त्वरित बस सेवा सुरू होईल व असे आश्वासन दिले यावेळी जिल्हा प्रमूख गणेश घोराळे,जिल्हा संयोजक ऋषीकेश वाघमारे,जिल्हा सह-संयोजक सानिका राठोड,खामगाव नगर मंत्री गणेश कठाळे,सह नगर मंत्री जागृती नेमाने,आनंद निकाळजे, वैष्णवी जवळकार,कोष सह प्रमुख पार्थ वराडे एस. एफ.एस प्रमुख शुभम राठोड एस.एफ.डी.प्रमुख शुभम राजपूत आय.टी.आय.अध्यक्ष ओम काळे, मे डिव्हिजन प्रमुख रोशन काळे, व्यंकटेश जुनारे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post