झोन चेअरपर्सन लॉ. उज्वल गोयनका यांच्या नेतृत्वाखाली झोन सोशल फन बोनान्झा संपन्न



खामगाव लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीचे झोन चेअरपर्सन उज्वल गोयनका यांच्या नेतृत्वाखाली १५ डिसेंबर रोजी चांडक फर्म हाऊस, शेगांव रोड, खामगांव येथे झोन सोशल फन बोनान्झा आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमाला लॉयन्स कुटुंबातील सदस्यांनी हजेरी लावली आणि एकत्र संस्मरणीय संध्याकाळचा आनंद लुटला. या कार्यक्रमाला मनोरंजनात्मक अंताक्षरी, संगीतमय हौजी हंगामा आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा यांचा समावेश होता.


या कार्यक्रामाला प्रदेश अध्यक्ष लॉ. सुरज एम. अग्रवाल, कॅबिनेट ऑफीसर पीएसटी आणि सर्व लॉयन्स सदस्य उपस्थित होते. लॉ. नरेश चोपडा आणि पुजा जांगीड हे परिक्षक होते. सुत्रसंचालन म्हणून भारती गोयनका, सरिता अग्रवाल, दिव्या अग्रवाल, राधिका अग्रवाल यांनी संपूर्ण जबाबदारीने हा कार्यक्रम रोमांचक केला. लॉयन्स क्लब संस्कृती खामगांवला बेस्ट क्लब ऑफ द झोन तर लॉ. नरेश चोपडा यांना बेस्ट लॉयन ऑफ द झोनचा पुरस्कार देण्यात आला.


जळगांव जामोद येथुन आलेले गायक सुरेश उनाडकट आणि अनुराग तिवारीही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी झोन चेअरपर्सन उज्वल गोयनका यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर सर्वानी मेजवानीचा आनंद लुटला. वरील माहिती क्लबचे मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post