जेसीआय खामगांव सिटीचा पदग्रहण सोहळा २४ डिसेंबरला संपन्न.
खामगाव जेसीआय खामगांव सिटीचा नविन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा दि. २४ डिसेंबर रोजी प्रेम रेसीडेन्सी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरूवात युविका गोयनका व नव्या गोयनका यांनी सादर केलेल्या श्री गणेश वंदना द्वारे करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दिपक प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला अकोला शहराचे प्रतिष्ठीत सी.ए. प्रशांतजी लोहीया, जेसीआयचे माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी.ए. मनोजजी चांडक, झोन प्रेसीडेन्ट जेसी डॉ. कुशल झंवर, झोन व्हाईस प्रेसीडेन्ट जेसी शालिनी राजपुत, जेसी डॉ. भगतसिंग राजपूत, जेसी विजय टावरी, जेसी संजय बोहरा, जेसी डॉ. कुशल झंवर, जेसी कुणाल राठी, वरिष्ठ मार्गदर्शक जेसी डॉ. प्रकाश मालु, जेसी डॉ. ज्योती मालु, जेसी अमरजितसिंग बग्गा, जेसी विरेंद्र शहा, जेसी अमोल बाहेकर, जेसी शशांक कस्तुरे, जेसी हरप्रितकौर बग्गा, जेसी प्रमोद वाघमारे, जेसी चेतना पाटील, जेसी संगीता नावंदर, जेसी आनंद पालीवाल, जेसी चंद्रशेखर पाटील, जेसी संकेत नावंदर, जेसी सुयोग झंवर, जेसी प्रणवेश राठी, जेसी पंकज अग्रवाल, जेसी बबली छाबरा, जेसी अभिषेक राठी, जेसी प्रतिमा निखाडे, जेसी स्वाती तराळे, जेसी भुषण गरड, जेसी सुयश टावरी, जेसी हिमांशु झंवर, बलजितसिंग छाबरा यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी नवनियुक्त अध्यक्ष जेसी साकेत गोयनका, सचिव जेसी विनम्र पगारीया व कोषाध्यक्ष जेसी मिलन नावंदर, आयपीपी जेसी प्रणवेश राठी, केअरटेकर पास प्रेसीडेन्ट जेएफएम अॅड. कुणाल राठी, जॉईंट सेक्रेटरी जेसी दिपीका राठी, व्हाईस प्रेसीडेन्ट जेसी अभिषेक राठी, जेसी हिंमाशु झंवर, जेसी भुषण गरड, जेसी सुयश टावरी, जेसी बलजितसिंग छाबडा तसेच डायरेक्टर जेसी गौरवी ठाकूर, जेसी निखीलेश राठी, जेसी गुर्लिन छाबरा, जेसी सोनल बुध्ददेव, जेसी प्रियंका बोरीकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या समक्ष शपथविधी संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नवनियुक्त कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. यावेळी समस्त जेसीआय खामगांव सिटी परिवार सदस्य, पदाधिकारी व शहरातील नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संकेत नावंदर, सोनल बुध्ददेव यांनी केले तर आभार प्रदर्शन विरेंद्र पगारीया यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Post a Comment