नियम पाळा अपघात टाळा
खामगावात रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम कार्यशाळा
खामगाव नितेश मानकर जनोपचार न्यूज नेटवर्क: जिल्हा पोलीस अधीक्षक पानसारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज खामगाव येथे वाहतूक नियम व रस्ता सुरक्षा कार्यकाळ घेण्यात आली. रस्त्याने चालताना वाहन चालकांनी कोण कोणते नियम पाळावेत जेणेकरून अपघात होणार नाहीत याबाबत माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक टाटा कंपनीच्या जनरल मॅनेजर अमिताभ सरकार यांनी यावेळी सखोल माहिती दिली. आरटीओ इन्स्पेक्टर रोढे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदर राम कृष्ण पवार, ठाणेदार पितांबर जाधव, जिल्हा वाहतूक शाखेचे एपीआय स्वप्निल नाईक यांची उपस्थित होते. यावेळी टॅक्सी ड्रायव्हर ऑटो चालक वाहन चालक यांच्यासह जिल्हा वाहतूक शखेचे पीएसआय अनिल कीटे, सतीशसिंग राजपूत , सोनवणे मुंजाळ राऊत नरोटे पोहेकॉ राहुल इंगळे, सुनील सोळंके जावेद शेख परमेश्वर नागरे यांच्यासह वाहनधारक व चालकांची उपस्थिती होती
Post a Comment