लॉयन्स क्लब संस्कृती तर्फे मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन
खामगाव - लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती तर्फे दि. ४ डिसेंबर रोजी स्थानिक बस स्थानकावर मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांसोबत इतर लोकांनाही याचा लाभ घेतला. या शिबीरात मधुमेह आणि बी.पी. ची तपासणी करण्यात आली. ३०० हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला. या कार्यात डॉ. आशिष व्यास आणि लॉ. मुखीया यांनी सहकार्य केले. सोबतच लॉयन्स क्लब संस्कृती खामगांव परिवाराचे सदस्य लॉ. नरेशजी चोपडा, अध्यक्ष लॉ. शैलेश शर्मा, कोषाध्यक्ष लॉ. गजानन सावकार, लॉ. निशीकांत कानुनगो, लॉ. रविंद्र बग्गा, लॉ. सिध्देश्वर दाने यांनी परिश्रम घेतले. वरील माहिती क्लबचे मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.
Post a Comment