संजय शिनगारे यांना मराठा भूषण पुरस्कार जाहीर

 रविवारी अकोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सन्मान

खामगाव - सामाजिक, राजकीय व आरोग्य क्षेत्रात सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष, संजय शिनगारे यांना मराठा सेवा मंडळ अकोला यांनी नुकताच ' मराठा भुषण ' हा पुरस्कार जाहीर केला आहे. येत्या २९ डिसेंबर  रोजी अकोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिनगारे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.



      संजय शिनगारे हे भारतीय जनता पार्टी खामगाव विधानसभा निवडणूक प्रमुख, शासकीय रुग्णकल्याण नियामक समिती (आमदार प्रतिनिधी) सदस्य सामान्य रुग्णालय खामगाव, श्री. तानाजी व्यायाम शाळा खामगावचे उपाध्यक्ष, जिल्हा शांतता समिती सद्स्य (बुलढाणा जिल्हा पोलीस दल) श्री ओकांरेश्वर मंदिर समिती सदस्य आदी पदांवर कार्यरत असून या माध्यमातून ते जनसेवेचे कार्य करीत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या तालमीत संजय शिनगारे यांचे व्यक्तित्व तयार झालेले असून भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनात त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविला आहे. स्व. भाऊसाहेबांचे आशीर्वाद व प्रेरणेने आपण जनसेवेचा वासा घेतलेला असल्याची प्रतिक्रिया संजय शिनगारे यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post