एक असेही दान......
आईचे स्मृती निमित्त 51 हजार रुपयाचे विद्यार्थ्यांना दान: वानखेडे दाम्पत्याचा अभिनव उपक्रम
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- समाजकार्य करताना अनेक दानशूर सातत्याने दान करितात.धर्म, सत्कार्य,अन्नदान केले जाते.सामाजिक परंपरा जोपासत असताना ज्ञानदान करीत काही पाईक आपला ठसा समाज मनावर उमटवितात .असाच एक अभिनव आणि तितकाच स्तुत्य उपक्रम जळका भडंग येथील डॉ किशोर आणि सौ सुषमा वानखेडे या दांपत्याने राबविला आहे*.
डॉ किशोर वानखेडे यांच्या आई स्व.सौ सिंधूबाई यांचे ब्रेन हम्रेज मुळे उद्भवलेल्या अती तीव्र आजाराने दिनांक.28 नोव्हेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले.80 दिवस पर्यंत वैद्यकी उपचार करीत असताना त्यांनी मृत्यूशी झुंज दिली.परंतु नाशवंत देह स्वर्ग लोकी जाणारच हे शास्वत सत्य आहे.आई सौ . सिंधू बाई ह्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री असलेल्या माई सावित्री बाई आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांनी प्रेरित होत्या. स्वतः निरक्षर असून ही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण प्रवाहात आणले आणि शिक्षण दानास सक्षम बनविले(शिक्षक बनवले).थोरला मुलगा किशोर ने इतिहासात संशोधन करताना डॉक्टरेट मिळविली,अनेक समाज उपयोगी ग्रंथांचे लेखन केले.महा मानवांचा वैचारिक लढा कृतीतून पुढे चालविला. सुविद्य सून सौ सुषमा वानखेडे यांनीही कुटुंबाला नैतिक तथा आर्थिक पाठबळ दिले.आईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या दांपत्याने आईच्या तेरवीच्या दिनी सर्व धार्मिक सोपस्कार करताना अन्नदान केले.सोबतच याच दिवशी 21 हजार रुपयांच्या पुस्तकांचे अनोखे दान विद्यार्थ्यांना दिले.ही पुस्तके महाविद्यालये,ग्रंथालये तथा होतकरू विद्यार्थ्यांना दिले गेले.तसेच 31 हजार रुपयाची आईचे नावाने विद्यार्थी हिताय कायम स्वरुपी ठेव दिली. या पूर्वी ही गावातील सुजाण व्यक्तींना सोबत घेत प्रभात वाचनालय सुरू केले येथून अनेक युवकांना प्रेरणा मिळाली.सोबतच मुळ गाव जळका भडंग असल्याने पि राजा केंद्रातील शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धेत प्रोत्साहन मिळावे या हेतूने दरवर्षी 3100 रुपयाची प्रोत्साहन पर पुस्तके देण्याचा संकल्प केला आहे. त्याची ही सुरुवात याच दिवशी केली.ग्रामीण भागातील होतकरू तरुण शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी हे वानखेडे दाम्पत्य पुढील काळातही सातत्याने प्रयत्नशील राहील.यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
Post a Comment