ना.आकाश फुंडकर उद्या खामगात:

ठीक ठिकाणी स्वागत:गांधी चौकात समारोप



खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर नामदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांचे उद्या २२ डिसेंबर रोजी प्रथमच खामगाव शहरात आगमन होत असून त्यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यानिमित्त खामगाव शहरातून भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार असून जगो-जागी फटाक्यांची आतिषबाजी करत मंत्री महोदयांचे स्वागत करण्यात येणार आहे. रॅली समारोपानंतर स्थानिक गांधी चौकात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. सलग तिसऱ्यांदा खामगाव विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय झालेले आमदारअॅड. आकाशदादा फुंडकर यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ना. आकाशदादा फुंडकर उद्या रविवार २२ डिसेंबर रोजी प्रथमच खामगाव शहरात येत आहेत. खामगावात आगमन प्रसंगी ना. फुंडकर यांचे शहरात भव्य स्वागत करण्यात येणार असून उद्या दुपारी शहरातून भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. ना. आकाशदादा यांचे शेगाव नाका येथे अगमनानंतर तेथून भव्य स्वागत रॅलीला प्रारंभ होऊन चांदमारी चौक, विकमशी चौक, टिळक पुतळा, केडिया टर्निंग (येथून ना. आकाशदादा फुंडकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून याच ठिकाणी परत येतील) तेथून पुन्हा रॅली महावीर चौक, मोहन चौक, फरशी, शहीद भगतसिंग चौक, एकबोटे चौक, टॉवर चौक गांधी बगिचा, अग्रसेन चौक, भाटीया एसटीडी समोरुन ही रॅली गांधी चौकात पोहचेल. या नंतर या ठिकाणी ना. आकाशदादा फुंडकर यांची भव्य समारोपीय सभा होणार आहे. या सभेला भाजप महायुतीचे जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी आपल्या मंत्री महोदयांच्या सन्मानार्थ निघणारी भव्य स्वागत रॅली व सभेला जिल्हाभरातील भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने

Post a Comment

Previous Post Next Post