टिळक स्मारक महिला मंडळाच्या वतीने भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन
![]() |
अधिक माहिती करीता सौ. आदितीताई गोडबोले ९३५९१ ३५०३३, अॅड.सौ.अपर्णा देशमुख ९८५०३५७६१३ या कमांकावर संपर्क साधावा |
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क:- स्थानिक टिळक स्मारक महिला मंडळाच्या वतीने नववर्षाचे स्वागत विविध समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून हर्षउल्हासात केल्या जाते. यावेळी महिला मंडळाच्या वतीने दि. ७ व ८ डिसेंबर शनिवार व रविवार रोजी टिळक स्मारक मंदिर येथे भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात गृहउपयोगी वस्तु प्रदर्शनी व विक्री, यासोबतच मुख्य आकर्षण म्हणून आर्टिफिशियल ज्वेलरी, सिल्क कुर्ती, कॉटन कुर्ती, बंगलुरी सिल्क सारी, फॅन्सी सारी, ई-बाईक जीन्स वरील फॅन्सी टॉप, सौंदर्य प्रसाधने , रेडीमेड ब्लाऊज, किड्सवेअर, बॅग्स, हाऊस होल्ड वस्तु, मुखवास, खेळणे, हेअर एसेसरीज, उपवास फुड्स, फॅन्सी बांगड्या, उन्हाळी वाळवण, विंटर वेअर कलेक्शन यासोबतच स्वादिष्ट म्हणून व्यंजन उकडीचे मोदक, झुणका भाकर, मुंग भजे • सॅण्डविच, दाभेली, मॅगी, दही वडा, भेळ संपुर्ण चाट व इतरही चवदार व्यंजनांसह भरपूर व्हेरायटी असणार आहे. तसेच यावेळी भव्य लकी ड्रॉ असून दोन्ही दिवसाकरीता प्रति दिवस तीन लकी ड्रॉ राहणार आहेत.
या आनंद मेळाव्यात पुरुष आणि महिला दोन्ही करीता भरपूर आनंददायी असे साहित्य उपलब्ध् असेल. आनंद मेळावा दुपारी ११ पासून रात्री ९ पर्यत सुरु राहणार आहे. सदर मेळावा हा शाळा क ६ बाजुच्या टिळक स्मारक मंगल कार्यालयात असणार आहे. या मेळाव्याकरीता नाममात्र शुल्क १० रुपये आकारण्यात येत असून अधिक माहिती करीता सौ. आदिती गोडबोले ९३५९१ ३५०३३, अॅड.सौ.अपर्णा देशमुख ९८५०३५७६१३ या कमांकावर संपर्कâसाधावा तसेच या आनंद मेळाव्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन टिळक स्मारक महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
![]() |
जाहिरात |
Post a Comment