यंदाचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे
खामगांव - स्थानिक तालुका विज्ञान शिक्षक संघटना व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते सदर विज्ञान प्रदर्शनी दिनांक 30 व 31 डिसेंबर रोजी वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था द्वारा संचालित सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे नामदार आकाशदादा फुंडकर कामगार मंत्री, सागर दादा फुंडकर अध्यक्ष वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था खामगांव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.सदर विज्ञान प्रदर्शनीत प्रत्येक विद्यालयातील प्राथमिक गटातुन एकउपरण व माध्यमिक गटातुन एक उपकरण तसेच प्रदर्शनीत दोन्ही गटातुन प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा होणार आहे.निबंध स्पर्धेचे विषय प्राथमिक गट-पाणी समस्या आणि उपाय, सौरऊर्जेचा वापर कसा वाढवावा, कडधान्यांचे आहारातील महत्त्व तसेच माध्यमिक गट- मानव-वन्यप्रणी संघर्ष, घनकचरा व्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प या विषयावर कोणताही एक निबंध वेळेवर लिहीणे आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रत्येक विद्यालयाने सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन विज्ञान शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष गणेश घोराळे व गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड यांनी केले आहे.
Post a Comment