हातभट्टी गावठी दारु निर्मुलना बाबत निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खामगाव पथकाची कारवाई
खामगाव नितेश मानकर :- निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खामगाव यांना हातभट्टी गावठी दारु निर्मिती व विक्री बाबत मिळालेल्या माहीती नुसार व सदर माहीतीप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता मौजे देऊळखेड शाहपुर, व मौजे चितोडा ता. खामगाव ठिकाणी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खामगाव-१ यांचे व स्टाफ तसेच पंचांसह जावुन दारुबंदी गुन्हयाकामी छापे घातले असता मौजे देऊळखेड शहापुर ता. खामगाव जि. बुलढाणा या ठिकाणी १) लक्ष्मण सुरेश सैरिशे व २) प्रकाश महादेव अंभोरे तसेच मौजे चितोडा ता. खामगाव जि. बुलढाणा या ठिकाणी ३) वनिता कैलास तिडके व ४) गौतम शालीग्राम तिडके हे त्यांचे राहते घरी हातभट्टीची गावठी दारु गाळतांना तसेच गावठी दारु सह दारु गाळण्याचे साहीत्य बाळगुन असता मिहून आले आहे. त्यांचे ताब्यातुन ३० ली. गावठी दारु, ३४५ ली. मोहाफुल सडवा रसायन, व गावठी दारु गाळण्याचे साहीत्य असा एकुण ४६६८५/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींविरुद्ध निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खामगाव व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क खामगाव-१ यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत कलम ६५ b,c,e,f प्रमाणे गुन्हयाची नोंद केली आहे.
सदरची कार्यवाही विजय सुर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री. अर्जुन नाना ओहाळ विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, अमरावती विभाग अमरावती, मा. जिल्हाधिकारी बुलढाणा किरण पाटील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा पराग नवलकर यांचे मार्गदर्शनाखाली विकास पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खामगाव. रणधीर गावंडे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खामगाव १, सहा. दुय्यम निरीक्षक.गजानन पहाडे, जवान अमोल सोळंके, गणेश मोरे, शारदा घोगरे, गौरी पवार, यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास विकास पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खामगाव व रणधीर गावंडे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खामगाव १ हे करीत आहे.
Post a Comment