दिवाळीचे औचित्य साधून २४ वर्षांनी वर्गमित्रांचे 'गेट टू गेदर'



हिवरखेड: जनोपचार न्यूज नेटवर्क :- येथील श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय सन २०००-२००१ यावर्षी वर्ग दहावीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेल्या वर्ग मित्रांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून गेट टू गेदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे तब्बल २४ वर्षांनी सर्व वर्गमित्रांचा एकत्र भेटण्याचा योग आल्याने सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत एकत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० परीक्षा देऊन २००१साली या शाळेतून पुढील शिक्षण घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनी ही शाळा सोडली होती.पुढील शिक्षण,नोकरी,धंदा, व्यवसाय या निमित्ताने हे विद्यार्थी एकमेकांपासून दूर गेले होते.परत एकदा आपण एकत्र भेटावे म्हणून या कार्यक्रमाचे फोर सिझन हॉटेल (अंत्रज फाटा)  मध्ये आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ पांडुरंग हटकर यांनी सूत्रसंचालन केले त्यांच्या संगतीला रूपाली बोचरे ह्या होत्या. डॉ संतोष हटकर यांनी मार्गदर्शन केले तसेच अनंता सकळकळे यांनी आपल्या कवितेतून महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिला. श्याम पाटेखेडे यांनी विचार मांडले सोबत पुरुषोत्तम हिंगणकार, रवींद्र शिंगाडे होते. सर्वप्रथम शालेय जीवनामध्ये जे शिक्षक शिकवत त्यापैकी काही शिक्षकांनी या जगाचा निरोप घेतला अशा दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर सोबत शिक्षण घेत असताना काही कालावधीनंतर दोन वर्ग मित्रांनी या जगाचा निरोप घेतला.त्यांना सुद्धा श्रद्धांजली,सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली. क्रमवारी एकमेकांचा परिचय व सध्या काय करत आहे, अपत्य किती?ते काय करतात?व शालेय जीवनातील,संसारातील काही गमतीदार,मजेदार किस्से सांगत परिचय दिला. या कार्यक्रमांमध्ये काही ठराव पारित करण्यात आले.त्यामध्ये यापुढे सर्व वर्ग मित्रांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे अडचणीच्या वेळेस काही मित्रांना गरज पडल्यास आर्थिक मदत करायची, दरवर्षी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वांनी एकत्र येऊन सहभोजन करायचे, एकमेकांच्या ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात राहायचे एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. या स्नेहसंमेलनाकरिता पुणे,मुंबई, औरंगाबाद,नागपूर वेगवेगळ्या ठिकाणाहून सुद्धा मित्रमंडळी आलेली होती.या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक जण आपल्याला मिळालेल्या परिस्थितीशी तडजोड करत समाधानी दिसले. अनुराधा बगाडे, अश्विनी तांबडे, रेखा इंगळे,विजया इंगळे,सुलभा बगाडे,राधा लांडे,उमा खंडारे, सीमा खंडारे,सीमा काळे,संगीता गावंडे,गीता घाईट,मंदा तायडे,संतोष घाटे,गणेश वानखडे, महादेव कोल्हे,प्रमोद रावणकार,प्रकाश खेडकर, तुळशीराम वसोकार, शिवाजी महाले, शिवाजी ठेरे, धर्मराज पवार, किशोर खंडारे, पुरुषोत्तम खंडारे,गोपाल सातव,सर्वांनी सोबत सहभोजन केले. शेवटी आनंदात हसत एकमेकांचा निरोप घेऊन सर्व घरी परतले.

                            

                     

Post a Comment

Previous Post Next Post