पाटलांच  झुकत माप कुणीकडे?

विविध ठिकाणी "होम बैठका" व चर्चा? 


 विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखाली पाटील समाजाचा उमेदवार नसल्याने अनेक चर्चेला आता रंगत येऊ लागली आहे. निर्णयक समाज म्हणून पाटील समाजाला बघितल्या जाते आणि आता हा समाज आपले झुकते माप कुणाकडे देतो याकडे लक्ष लागून आहे. जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तशी तशी पक्ष पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे .मात्र अद्याप पाटील समाजाने आपले गुपित उघडलेले नाही त्यामुळे विविध ठिकाणी समाजात "होम बैठका" सुरू असल्याचे ऐकिवात असून विविध चर्चाही समोर  येत आहेत. दरम्यान "बहती गंगा मे हात धोलो" अशा उक्तीचे काही लोक आपणच समाजाचे ठेकेदार आहोत असा आव आनात असल्याचीही खमंग चर्चा सुरू आहे .मात्र वास्तविक पाहता घरोघरी सुरू असलेल्या गुप्त बैठकी मध्ये कोणाला पाठबळ मिळते हे आता वेळच सांगेल. तूर्तास "कसं काय पाटील बर हाय का? काल काय ऐकलं ते खरं आहे का?" अशी चर्चा सध्या जनमानसात सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post