कर्मचाऱ्यांचे कुटुंब बाहेरगांवी असल्यास त्यांना मतदानाकरिता येण्या-जाण्याच्या खर्च कंपनी करणार
यश एंटरप्राईजेसचे संचालक संतोष देशमुख यांनी घेतला पुढाकार
खामगाव(नितेश मानकर) - मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणुक विभागाकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असून या अंतर्गत कंपनी मालकांना आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नातेवाईकांना मतदानाकरिता प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत येथील एमआयडीसी मधील यश एंटरप्राईजेसचे संचालक संतोष देशमुख यांनी कर्मचाऱ्यांचे कुटुंब बाहेरगांवी असल्यास त्यांना मतदानाकरिता येण्या-जाण्याच्या खर्च कंपनी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
खामगांव विधानसभा मतदारसंघामध्ये आयोगाच्या सुचनेनुसार खामगांव औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, उद्योजक, कामगार यश एंटरप्राईजेसयेथील कर्मचारी अधिकारी यांना मतदान करण्यास प्रवृत्त करुन जिल्हाउद्योग केंद्र बुलढाणा यांचे मार्फत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसारसहा. निवडणुक निर्णय अधिकारी सुनिल पाटील, गटविकास अधिकारीराजपुत, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी सुनिल पाटील, यांच्यामार्गदर्शनाखाली यश एंटरप्राईजेसचे संचालक संतोष देशमुख यांनी महत्त्वपूर्णनिर्णय घेतला आहे. १२०० कर्मचारी असलेल्या यश एंटरप्राईजेसचेसंचालक संतोष देशमुख यांनी असे आवाहन केले आहे की, यशएंटरप्राईजेस कर्मचाऱ्यांचे कुटुंबातील मतदार अगर बाहेरगांव असतीलतर त्यांचा मतदानाकरिता येण्या जाण्याचा खर्च कंपनी करणार.याबद्दल सहा. निवडणुक निर्णय अधिकारी सुनिल पाटील व गटविकास अधिकारी राजपुत यांनी संतोष देशमुख यांचे अभिनंदन केले.
Post a Comment