प.पु.श्री. सुधांशुजी महाराज यांचा खामगाव येथे एक दिवसीय भक्त्तीसत्संग

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- विश्वविख्यात संत प.पु.श्री. सुधांशुजी महाराज यांचे एकदिवसीय भुमीपूजन एवंम भक्तीसत्संग कार्यक्रमाचे आयोजन १२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आनंदधाम आश्रम वाघळी खामगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. आनंदधाम आश्रम वाघळी येथील पावन भुमीवर भव्यदिव्य महालक्ष्मी मंदिर तसेच विशाल गुफा व सरोवर आदी निर्माण कार्याचा भुमीपुजन सोहळा प.पु.श्री. सुधांशुजी महाराज यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. भुमीपुजन कार्यक्रमानंतर भक्तीसत्संग कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाकरीता नागपुर, अकोला, अमरावती, खामगाव व इतर ठिकाणाहून गुरूभक्त व - धर्मप्रेमी उपस्थित राहतील. 

तरी सर्व भक्तजन धर्मप्रेमी व समाजसेवाधारी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. कार्यक्रम समाप्तीनंतर महाप्रसाद वितरण करण्यात येईल, असे आवाहन विश्वजागृती मिशन खामगाव मंडळाचे  आचार्य शिवदत्तजी महाराज, प्रधान वामनराव लिखारे, सचिव राजेश झापडे यांनी केले आहे. दरम्यान काल या संदर्भात बैठक पार पडली. नियोजन बैठकीत कमलकिशोर मंत्री, बाबुलालजी चुडीवाले, अमित गोयनका, अमोल अंधारे, राजुभाऊ राजपुत यांची विशेष उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post