आ अँड आकाश फुंडकर यांचे सत्कारासाठी लाडक्या बहिणींचा ओघ सुरूच
खामगाव::- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आठवडा उलटला तरीही खामगाव मतदार संघाचे लाडके भाऊ आमदार अँड आकाश फुंडकर यांचे स्वागत व सत्कारासाठी लाडक्या बहिणी अजूनही दररोज शेकडोच्या संख्येने येत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पार पडली. त्यानंतर 23 तारखेला खामगाव चे युवा व लाडके आमदार यांनी विजय संपादित करत विजयाची हॅट्रिक केली. त्यानंतर त्यांना शुभेच्छा व सत्कार करण्यासाठी खामगाव मतदारसंघातील तसेच बुलढाणा अकोला येथे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत आहेत.
निवडणूक निकालानंतर निघालेल्या खामगाव शहरात त्यांची भव्य मिरवणूक निघत असताना सर्व समाज घटकांनी त्यांचे जागोजागी भव्य दिव्य असे स्वागत केले. त्यानंतर स्थानिक भाजपा कार्यालयात दररोज शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते आकाश दादांच्या स्वागतासाठी व सत्कारासाठी येत आहेत. निकालाच्या आठ दिवसानंतरही शेकडो कार्यकर्ते व सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने त्यांचे स्वागतासाठी येत आहेत. आज सुद्धा शेकडो खामगाव तालुका भाजपा महिला आघाडी महिलांनी भाजपा कार्यालयात येऊन आकाश दादांचा भव्य सत्कार केला.
भाजपा महिला मोर्चा खामगाव विधानसभा संयोजिका तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती सौ उर्मिलाताई गायकी, महिला मोर्चा खामगाव तालुकाध्यक्ष सौ रेखा घोंगे, पंचायतराज समितीच्या संयोजिका सौ रत्नाताई डिक्कर ,जिल्हा उपाध्यक्ष श्रद्धा धोरण, संयोजिका अमृता वानखडे, सौ शिल्पा वाघमारे, सौ नंदिका सोनोने, सौ लता ताठे, सत्यभामा दही, सौ वनिता वाघमारे, सौ रेखा नेमाने, सौ भक्ती वाणी, यांच्यासह शेकडो खामगाव ग्रामीण मंडळातील महिला यांनी खामगाव मतदार संघाचे लाडके आमदार आकाश दादा फुंडकर त्यांचे औक्षण करून त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. खामगाव ग्रामीणमध्ये विधानसभेचे संयोजक म्हणून भाजपाचे जिल्हा महामंत्री शरदचंद्रजी गायकी यांनी महिला मोर्चाचे प्रचाराचे उत्कृष्ट नियोजन करून आकाश दादांना भरघोस मतांनी विजय मिळवून देण्यासाठी महिला मोर्चाला अधिक बळ दिले. आज भाजपा कार्यालयात खामगाव तालुका भाजपा महिला मोर्चा च्या पदाधिकारी तसेच शेकडो लाडक्या बहिणींनी आकाश दादांना त्यांचे स्वागत व सत्कार करून सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे ठोस आश्वासन देत त्यांच्या नावाचा व महायुतीचा जयघोष केला.
Post a Comment