पंचशील होमिओपॅथीक वैद्याकीय महाविद्यालय येथे स्नेहसंमेलन,माजी विद्यार्थी भेट, ऋणानुबंध-२०२४मोठ्या थाटात संपन्न

स्थानीक पंचशील होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयास ६५ वर्ष पुर्ण होण्याच्या निमित्ताने ऋणानुबंध-२०२४ चे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी दिनांक २२/११/२०२४ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाकरीता स्नेहसंमेलन आयोजीत करण्यात आले. या वेळी उद्घाटन सत्रामधील कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब कवीश्वर, उदघाटक डॉ. सौ. मंगलाताई कवीश्वर प्रमुख अतिथी डॉ. यशवंत वानखडे, प्रमुख उपस्थीती प्रा. डॉ. अर्जीक्य कवीश्वर व डॉ. सौ. निलीमा वानखेडे हे होते. या वेळी मान्यवरांनी ऋणानुबंध-२०२४ करीता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्नेहसंमेलनात वैद्यकीय विषयावर आधारीत रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा तसेच सेल्फी पॉईंट स्पर्धेबरोबरच नाटक, नृत्य व गायनाचा बहारदार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.



दिनांक २३/११/२०२४ रोजी आजी विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी तसेच विविध भागातून आलेल्या होमिओपॅथीक डॉक्टरांकरीता National Homoeopathic Scientific Seminar चे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष डॉ. दादासाहेब कवीश्वर, उदघाटक प्रा.डॉ. श्री. अजय दहाड सर चांदवड, प्रमुख अतिथी सौ. मंगलाताई कवीश्वर, प्रमुख उपस्थीती प्रा. डॉ. अर्जीक्य कवीश्वर, डॉ. प्रलय शर्मा, डॉ. पार्या रॉय हे होते. या वेळी मान्यवरांनी होमिओपॅथी तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन व ज्ञानाच्या आदान प्रदानाचे महत्व विषद केले. महाविद्यालयचा पाया हा गरजुंना माफक दरामध्ये औषधोपचार मिळावा, तसेच होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मिळावे म्हणुन १९५९ मध्ये डॉ. बाबासाहेब कवीश्वर यांनी या महाविद्यालयाचा पाया रचला आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला असला तरी महाविद्यालयाने आजही सामान्य जनतेशी आपली नाळ आजही जोडली आहे. त्याचबरोबर संशोधनालादेखील प्रोत्साहन देण्याचे काम महाविद्यालय करीत आहे, याचाच भाग म्हणुन आज येथे राष्ट्रीय होमिओपरीषदेचे आयोजन करण्यात आले आहे असे डॉ. दादासाहेब कवीश्वर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगीतले. यावेळी कलकत्ता येथील डॉ. प्रलय शर्मा, (National Institute of Homoeopathy) यांनी व डॉ. पार्या रॉय छत्रपती संभाजीनगर यांनी आपले तज्ञ मार्गदर्शन केले. याप्रसंगी संचलन डॉ. विप्लव कवीश्वर व डॉ. स्मिता लष्करे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रभुदास मुखीया यांनी केले. यावेळी सायंकाळी आयोजीत विविध सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये आजी व माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


दिनांक २४/११/२०२४ रोजी आयोजीत National Homoeopathic Scientific Seminar मध्ये डॉ. एस. पी. सिंह अलाहाबाद यांनी तज्ञ मार्गदर्शन केले, तसेच डॉ. मनीषा शिंदे नाशीक, डॉ. साकेत सिंग महेसाना गुजरात डॉ. वृषाली बारध्दे जोधपुर, डॉ. विप्लव कवीश्वर, डॉ. जयश्री ढोकणे व डॉ. स्वप्नाली बाठे यांनी आपले शोध प्रबंध सादर केले. याप्रसंगी पंचशील होमिओपॅथीक वैद्याकीय महाविद्यालया द्वारे महाविद्यालयीन प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शोधनिबंध असलेल्या स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.. याप्रसंगी संचलन डॉ. निशांत मुखीया व डॉ. माधुरी वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रभुदास मुखीया यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले

Post a Comment

Previous Post Next Post