सध्या शाळा, महाविद्यालये व कार्यालयांना सुट्या व निवडणूकीचा कालावधी असल्याकारणाने रक्तपेढीमध्ये स्वेछेने रक्तदान करणारे व रक्तदान शिबीरे आयोजनाचे प्रमाण कमी झालेले आहे. त्याचा परीणाम म्हणून रक्ताची तातडीची टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे या रक्त टंचाइचा रुग्णसेवेवर परीणाम जाणवत आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा उपलब्ध करून देणे शक्य होण्याकरीता  खामगाव शहरातील व तालुक्यातील विविध संस्था/मंडळे/कार्यालये/महाविद्यालये यांना स्वेछेने रक्तदान करणे / रक्तदान शिबीरे आयोजित करा वें  असे आवाहन खामगाव सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post