बेवारस मृतदेहांवर करणार टायगर ग्रुप अंत्यसंस्कार !
पियुष चव्हाण यांची माहिती .
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- समाज उपयोगी उपक्रम राबवत असतानाच देवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची संकल्पना मुळात रुजू करण्यात आता टायगर ग्रुपने पुढाकार घेतला आहे. अपघात किंवा अघटीत घटना अशा प्रसंगी आढळलेले मृतदेह दोन ते तीन दिवस तसेच ठेवावे लागतात मात्र त्यानंतरही मृतदेहाला कोणी वारस मिळत नाही अशा परिस्थितीत पोलीस व नगर प्रशासनाच्या मदतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात, त्यामुळे संस्कृती प्रमाणे अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार व्हावे या उदात्त हेतूने येथील टायगर ग्रुप ने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रशासनाने अशा मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी टायगर ग्रुप ची संपर्क साधावा असे आवाहन टायगर ग्रुप चे तालुका अध्यक्ष पियुष चव्हाण व तालुका उपाध्यक्ष अंकुश हटकर यांनी केले आहे.
Post a Comment