ॲड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात डिवरे पती-पत्नीसह शेकडो महिला कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश !
(वनिता मानकर)खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-खामगाव शहरातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते श्री. नरेंद्र डिवरे आणि सौ. वर्षा डिवरे यांच्या नेतृत्वाखालील शेकडो महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात झाला. खामगाव शहरात डिवरे दाम्पत्याचे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर परिचित आहे, ज्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश भाजपाच्या संघटनात्मक विस्ताराला मोठी चालना देईल.
नरेंद्र डिवरे आणि सौ. वर्षा डिवरे यांनी खामगाव शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. स्थानिक पातळीवर जनतेशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिलांचे प्रश्न, सामाजिक न्याय, आणि स्थानिक विकासासाठी महत्वपूर्ण कार्य केले आहे. भाजपात यांचा प्रवेश झाल्याने, पक्षाच्या महिला आघाडीचे बळ वाढण्यास मदत होईल आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावेल.
Post a Comment