"हार्ट अटॅकच्या रुग्णाला ऍसिडिटी च्या गोळ्या?"
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू: मातेची तक्रार
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलकर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतक जगदीश गुजर यांच्या आईने केली आहे. छातीत दुखत असलेल्या रुग्णाला ऍसिडिटी च गोळ्या देण्यात आल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.
![]() |
..........जाहिरात....... |
या तक्रारीत नमूद आहे की,"मी श्रीमती संगीता राजु गुजर माझा मुलगा जगदीश राजु गुजर यास दि 15-10-2024 रोजी सकाळी अंदाजे 3 वाजता पोट दुखणे, छातीमध्ये दुखणे व उलट्यांचा त्रास होत असल्यामुळे त्याला आपल्या सामान्य रुग्णालय मधे आणले होते परंतु नाईट ला ड्युटी वर असणारे डॉक्टर यांनी कुठल्याही प्रकारचा चेक अप न करता फकत अॅसिडिटी व पोट दुखण्याचा गोळ्या देऊन रवाना केले.पण रात्र भर त्रास कमी न झाल्यामुळे आणि दुखणे वाढत असल्यामुळे मी सकाळी अंदाजे 8 ते 8 :30 दरम्यान माझ्या मुलाला घेऊन पुन्हा एकदा आपल्या दवाखाना मधे ओपीडी मधे घेऊन आले असता सकाळी ड्यूटी वर असलेल्या आपल्या डॉक्टरांनी असे सांगितले की सध्या ओपीडी बंद असून तुम्ही बाह्यरुग्ण विभाग मधे दाखवावे.परंतु पेशंट ची प्रकृती गंभीर असल्यामुळे आम्ही त्याला डॉक्टर बावस्कर यांच्या रुग्णालयामध्ये नेले तेथे डॉक्टरांनी ECG व चेक अप करून सांगितले की रात्रीच या पेशंटला मेजर अटॅक आला असून त्यांनी त्वरित ऍडमिट होण्याची सल्ला दिली.तर आम्ही अंदाजे 10 ते 10:30 दरम्यान आमच्या पेशंट ला घेऊन पुन्हा सामान्य रुग्णालयात ऍडमिट करण्यासाठी घेऊन आलो तर आपल्या डॉक्टरांनी आमच्या पेशंट चा जीव जाईपर्यंत कोणत्याच प्रकारचा उपचार किंवा चेक अप केला नाही आणि आम्हाला आमच्या पेशंतचा जीव गमवावा लागला.रात्री ड्युटी वर असलेले डॉक्टर आणि सकाळी ड्युटी वर असलेले डॉक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या पेशंटला जीव गमवावा लागला या दोन्ही डॉक्टरांवर कायदेशीर कारवाही व्हावी. ही विनंती."
Post a Comment