कर्तव्यदक्ष आमदार आकाश फुंडकर यांचा नागरिकांना संदेश..... सावधान रहा सतर्क रहा

प्रिय खामगाव मतदार संघातील नागरिकांनो,

अतिवृष्टीमुळे आपल्या शहरासह अनेक ग्रामीण भागांत नद्या-नाले ओव्हरफ्लो होत आहेत, अशा कठीण प्रसंगी मी आपल्यासोबत ठामपणे उभा आहे. कृपया घाबरू नका; सर्वांनी सुरक्षित ठिकाणी राहावे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

आपल्या भागातील कार्यकर्त्यांनी आपल्याशी संपर्क साधला असून, मी आपली सर्व मदत करण्यास तयार आहे. काहीही समस्या असल्यास, कोणतीही भीती न बाळगता त्वरित संपर्क साधा.

शासनाशी सतत संपर्कात राहून मी आपल्या भागातील स्थितीबाबत माहिती घेत आहे.

आपण सर्वजण सावध राहा, सतर्क राहा आणि स्वतःची काळजी घ्या .आपली सुरक्षितता माझ्यासाठी सर्वोच्च आहे, आणि मी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे.

आपलाच, 

 आकाश पांडुरंग फुंडकर आमदार, खामगाव विधान सभा मतदार संघ

Post a Comment

Previous Post Next Post