शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक डॉ. शिवप्रसाद गोंधणे यांची मेहकर विधानसभेतून निवडणूक लढविण्याची इच्छा: पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी
मेहकर (जनोपचार न्यूज नेटवर्क) मेहकर मतदार संघातून निष्ठावंत जेष्ठ शिवसैनिक डॉक्टर शिवप्रसाद गोंधने यांनी मुंबई येथे जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षाच्या प्रत्येक लढ्यामध्ये ते सक्रिय असतात .गेल्या ३६ वर्षापासून ते कोणतेही पद न मागता त्यांनी शिवसेना वाढवीण्यासाठी एकनिष्ठकार्य केले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे मेळावे सुद्धा त्यांनी घेतले. ग्रामीण भागात तसेच शहरात आणि वार्डा वार्डात मध्ये त्यांनी अनेक शाखा सुद्धा ओपन केलेल्या असून अनेक वेळा त्यांनी उमेदवारी मागितली परंतु उमेदवारी मिळाली नाही . असे असतानाही त्यांनी एक सच्चा शिवसैनिक असल्याचे सिद्ध करत ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली त्यांना तन मन धनाने निवडून आणले आहे. डॉक्टर गोधने हे मध्यभारतातील चर्मरोग तज्ञ आहे. डॉक्टर गोंधने मेहकर व जिल्ह्यामध्ये गरजू रुग्णांना मोफत इंजेक्शन, गोळ्या, लोशन मोफत देतात तरी जिल्ह्यातील एकमेव निष्ठावंत कार्यकर्ता उमेदवारी मिळावी ही मागणी पक्षाकडे केल्याचे वृत्त आहे.
Post a Comment