वंचितचे युवा नेते संघर्षनायक देवाभाई हिवराळे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
खामगाव विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार देवाभाई हिवराळे यांनी शेवटच्या दिवशी लाखोंच्या जनसमुदायाला साक्षी ठेऊन श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाला अनुसरून उमेदवारी अर्ज दाखल केला. आज दिनांक 29/10/2024 रोजी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले युवा लोकप्रिय समाजप्रिय वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार देवाभाऊ हिवराळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज सादर करतांना समाजभूषण अशोकभाऊ सोनोने,धनगर समाजाचे जेष्ठ नेते शरदभाऊ वसतकार,ओबीसी समाजाचे लोकप्रिय नेते शांताराम पाटेखेडे, प्रा.डॉ.अनिल अंमलकार,अंबुस्कर सर,ऍड आर.डी. भोजने,ऍड. अनिल इखारे, ऍड.विश्वंभर गवई,साहेबराव तायडे,संघपाल जाधव,राजेश हेलोडे, विजय वानखडे,बाळू मोरे,नितेश हिवराळे, डॉ.जगदीश तिडके,निलेश हिवराळे, सचिन हिवराळे, गौतम तिडके,शेख शब्बर, अन्सार अली,लाला कुरेशी मोहन नागे,अंबादास नागे सोपान नागे,नंदू नागे, व लाखोंच्या संख्येने बहुजन समाजाचे मतदार उपस्थित होते.प्रचंड ताकदीने विजय संपादन करून देवाभाऊ खामगाव विधानसभेवर वंचितच झेंडा फडकवतील असा सूर जनमानसातून दिसून येत आहे.
Post a Comment