जिमच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह?
खामगावच्या सीएम हेल्प क्लब मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-आरोग्यासाठी व्यायाम हा सर्वोत्तम उपाय व उपचार आहे. त्यामुळे वायामासाठी मुलेच नव्हे तर मुली देखील जिम मध्ये जाऊन व्यायाम करतात. अशा ठिकाणी मुलींसाठी महिला प्रशिक्षणार्थी ठेवणे आवश्यक ठरते मात्र बऱ्याच जिम मध्ये मुलींना शिकवण्यासाठी पुरुष प्रशिक्षणार्थी ठेवण्यात येतात आणि त्यातूनच मग समाज मन सुन्न करणाऱ्या घटना समोर येतात. असाच प्रकार खामगाव येथील सीएम हेल्थ क्लब मध्ये घडला आहे. पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी चक्क अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. आणि याची रीतसर तक्रारही पोलिसात दाखल करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे आत विविध पक्षातूनही घटनेचा निषेध होत आहे.
Post a Comment