हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू

पुण्यात मोठी दुर्घटना झाल्याच समोर येत आहे. पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार,सकाळी पावणेसात वाजता हा अपघात (Helicopter Crash) झाला आहे. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर असे तिघ जण होते. हेलिकॉप्टरणने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले.अपघाताचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी घटना आहे, काही दिवसांपूर्वी मुळशीमध्ये देखील अशीच घटना घडली होती. सुदैवाने त्या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती.

याठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे. येथील हेलिपॅडवरुन आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, हा भाग डोंगराळ असल्याने या ठीकणी दाट धुके होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे सांगितले जाते आहे. अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काऊंटी आणि एच.ई.एम.आर. एल. संस्थाच्या तेथील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जातयं. हा संपूर्ण निर्मनुष्य परिसर आहे.

                                                               साभारott 

Post a Comment

Previous Post Next Post