खामगाव रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराला लहूजी साळवे नाव देण्यात यावे सोशल फोरमची मागणी
*खामगाव:- खामगाव रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेश व्दाराला क्रांतीगुरु लहूजी साळवे नाव देण्यात यावे अशी मागणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. १ सप्टेंबर रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे पदाधिकारी यांनी खामगांवचे रेल्वे स्टेशन मास्टर यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. सदर निवेदनात म्हटले आहे की .खामगाव रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराला इंग्रजा विरूद्ध स्वातंत्र्य चळवळीचे रणसिंग फुंकणारे क्रांतिगुरु लहूजी साळवे ह्या भारत मातेच्या सुपुत्राचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कारार्थी ज्येष्ठ नेते संताराम तायडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम बुलढाणा जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष कृष्णा नाटेकर संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन सोनोने जिल्हा सचिव सिताराम इंगळे युवा तालुकाध्यक्ष आकाश पाटोळे गोलू सकळकळे आनंद साबळे करण सकळकळे धनराज वानखडे आकाश पाटोळे सुरज खंडारे रवि सकळकळे आदीसह सोशल फोरमचे कार्यकर्ते उपस्थित होते*
Post a Comment