गो. से. महाविद्यालयामध्ये लायन्स क्लब खामगाव द्वारा कर्करोग चिकित्सा शिबिर संपन्न
खामगाव (नितेश मानकर) लॉयन्स क्लब खामगाव द्वारा दिनांक 2 ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सप्ताहामध्ये विविध समाज उपयोगी प्रकल्प राबविण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी तसेच कर्करोग चिकित्सा, अन्नदान, स्वच्छता अभियान, पर्यावरण पूरक उपक्रम इत्यादींचा समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून स्थानिक गो. से. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींकरिता कर्करोग विशेषता स्तनाचा कर्करोग चिकित्सा व याबद्दल जागृती शिबिर राबविण्यात आले.
ह्या कार्यक्रमाकरिता अध्यक्षस्थानी लॉयन्स क्लब खामगाव चे अध्यक्ष एम. जे. एफ. लॉयन शंकर परदेशी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लॉ. डॉ. सुरेखा मेंढे, डॉ. समृद्धी मेंढे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच लॉयन्स क्लब खामगावचे सचिव लॉ डॉ. धनंजय तळवणकर यांनी प्रास्ताविकामध्ये कर्करोगाबद्दल जनजागृती आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यानंतर डॉ. सुरेखा मेंढे यांनी विद्यार्थिनींना कर्करोगाची कारणे, ते टाळण्याकरिता घ्यावयाची काळजी, त्याची काही चिन्हे दिसत असल्यास योग्य वेळी चिकित्सा इत्यादी बाबत व्हिडिओ क्लिप द्वारे मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. समृद्धी मेंढे, डॉ. मृणाल, डॉ. वैष्णवी यांनी विद्यार्थिनींची तपासणी केली. मार्गदर्शनपर कार्यक्रमाच्या वेळी मंचावर लॉयन्स क्लब खामगाव चे कोषाध्यक्ष लॉ. राहुल भट्टड तसेच रिजन सेक्रेटरी एमजेएफ लॉ. महेश चांडक उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये एमजेएफ लॉ शंकर परदेशी यांनी आपल्या आहार व व्यायाम याच्या सवयी बाबत मार्गदर्शन केले व जंक फूड न खाण्याचा संकल्प विद्यार्थी विद्यार्थिनींनी करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन गो से महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण समितीच्या प्रा. पूनम तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संगीता वायचाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता गो. से. महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण समितीचे सर्व पदाधिकारी व समन्वयक डॉ. निता बोचे यांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.
Post a Comment