जळका भडंग येथे गौतम गवई यांची भेट
खामगाव - काँग्रेस पक्षामध्ये खामगाव विधानसभा मतदार संघाचे प्रभावी दावेदार गौतम गवई यांनी जळका भडंग येथे आज दिनांक 4/10/24 रोजी भेट दिली. धर्म निरपेक्ष भारत निर्माण करण्यासाठी व समृद्ध लोकशाही साठी प्रत्येक माणसाने प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक समाज घटकाला न्याय दिला पाहिजे या भूमिकेतून आपण उमेदवारी मागितल्याचे वक्तव्य गौतम गवई यांनी केले. आपण खामगाव विधानसभा मतदार संघात दावेदारी केली आहे असे गौतम गवई यांनी सांगितले. गौतम गवई यांच्या प्रभावी दावेदारी मुळे उपेक्षित - पीडित घटकात उत्साह संचारला आहे. गावोगावी लोन पसरले आहे. काँग्रेस पक्षाने खरोखरच गौतम गवई यांना उमेदवारी द्यावी अशी मांडणी करतांनाअंबादास वानखडे माजी उपसभापती यांनी जातीय समीकरण समजावून सांगितले.. यावेळी जळका भडंग वासियांननीही गौतम गवई यांचे जोरदार समर्थन केले. यावेळी महेंद्र दामोदर उपसरपंच दिनकर दामोदर भीमराव तायडे पद्माकर दामोदर रामभाऊ दामोदर मधूकर दामोदर विजय दामोदर विजय तायडे पंकज दामोदर गौतम दामोदर प्रमोद दामोदर प्रकाश दामोदर बापू दामोदर रणीत दिवसदास दामोदर सर इत्यादी उपस्थित होते.
Post a Comment