आत्मदीप जागवणे हीच खरी दिवाळी -ब्रह्मकुमारी शकुंतला दीदी
दिनांक 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार रोजी सकाळी स्थानीय रायगड कॉलनी येथे ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात दिवाळी उत्सव साजरा करण्यात आलासर्वप्रथम 6.30 ते 7.00 सामूहिक मेडिटेशन करण्यात आले त्यानंतर 7 ते 8 ईश्वरीय महावाक्याचे श्रवण करण्यात आले सेवा केंद्र संचालिका शकुंतला दीदी यांनी दिवाळी सणाचे अध्यात्मिक रहस्य सांगितले, विघ्नहर्ता श्री गणेश, सुख समृद्धीची दाता महालक्ष्मी माता, विद्येची देवी सरस्वती माता यांची चैतन्य झाकी सादर करण्यात आली ह्या झाकीमध्ये गणेशाच्या भूमिकेत नक्ष मोरानी, महालक्ष्मीच्या भूमिकेत प्रिया कापडे, सरस्वतीच्या भूमिकेत आरती लोखंडकार हे होते कुमारी देविका कपडे घेणे नृत्य प्रस्तुत केले. दिवाळीनिमित्त भेट म्हणून सर्वांना दिव्य गुणांचे वरदान वाटण्यात आले. याप्रसंगी दीप प्रज्वलन श्री बिरजू भट्टड सौ.रजनी देवी मोहता, विजय पवार, शकुंतला दीदी, सुषमा दीदी दिव्या दिदी यांच्या हस्ते करण्यात आले. महालक्ष्मी पूजनानंतर सामूहिक महाआरती करण्यात आली शेवटी सर्वांना प्रसाद वाटण्यात आला मोठ्या संख्येने ब्रह्माकुमारी परिवारातील सदस्य सहभागी झाले
Post a Comment