सानंदांच्या हस्ते श्री हनुमान नवयुवक मंडळ ची आरती
जनोपचार न्यूज नेटवर्क :- स्थानिक सती फैल भागातील श्री हनुमान नवयुवक मंडळाकडून बसवण्यात आलेल्या गणपतीची आरती माजी आ. दिलीप कुमार सानंदा यांच्या हस्ते करण्यात आली.
त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे मंडळाच्या वतीने शाल व दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे यावर्षीश्री हनुमान नवयुवक मंडळकडून सादर करण्यात आलेले पुष्पक विमान विशेष देखाव्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीमती खासणे ताई माजी नगरसेवक व खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले व पंजाबराव देशमुख ,सती फैल भागातील प्रतिष्ठित नागरिक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत काका रेठेकर, राजपालशिंघ काका चव्हाण रामभाऊ बोन्द्रे,दिगंबर काका गलांडे, मंडळाचे सचिव अमोल अंधारे यांच्यासह मंडळातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment