श्री तानाजी व्यायाम शाळेच्या वतीने गणेशोत्सवा दरम्यान विविध स्पर्धा संपन्न:आज सांयकाळी पत्रकार बांधवांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण
खामगाव ः शहरात यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, शहरातील ख्यातीप्राप्त श्री तानाजी व्यायाम शाळेच्या वतीने श्री गणरायाची स्थापन करण्यात आली असून, यंदाही मंडळाच्या वतीने विविध कला व सांस्कृतिक स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे बक्षीस वितरण आज सायंकाळी पत्रकार बांधवांच्या हस्ते होणार असून, यावेळी खामगाव शहर व तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार बांधवांची उपस्थिती राहणार आहे.
यामध्ये गित गायन स्पर्धा करा ओके सिस्टीम, रांगोळी स्पर्धा, फ्लावर डेकोरेशन स्पर्धा, रंगो भरो व चित्रकला स्पर्धा, शिल्पकला स्पर्धा, स्वर वादन, ताल वादन स्पर्धा, सायन्स प्रोजेक्ट स्पर्धा, हस्तकला स्पर्धा टाकावू पासून टिकाऊ, सोलो डान्स, ग्रुप डान्स, लघु नाटीका पथनाट्य एकपात्री स्पधेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांना स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तानाजी मंडळाने यंदाही डिजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे देखील सर्वत्र स्वागत होत आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाच्या लाकडी गणपतीनंतर तानाजी गणेशोत्सव मंडळाचा क्रमांक राहतो. तसेच तानाजी व्यायाम शाळेच्या वतीने दरवर्षी शहरावासीयांचे आकर्षण ठरेल असे चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवणारे देशपातळीवरील ग्रुप आणले जातात. उपरोक्त सर्व स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेतले. संपुर्ण विश्वामध्ये नावलौकीक मिळविलेले प्रवीण प्रजापत यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक व पारंपरिक कला पथक हे आकर्षण राहणार आहे.
* संपन्न स्पर्धेतील विजेत्यांची नावे
गित गायन स्पर्धा (करा ओके) ः अ गट ः सान्वी बदरखे, ब गट कपिल धिंडोले,
रांगोळी स्पर्धा ः अंजुदिदी पुरवार,
रंग भरो व चित्रकला स्पर्धा ः काश्वि राहुल तिवारी, अखिलेश अजय मोहिते
शिल्पकला ः अ गट ः शुग्रा गजानन फंड, ब गट ः पियुश मांडवेकर.
स्वर वादन स्पर्धा ः कार्तिक झाडोलिया
ताल वादन ः स्वप्निल तायडे,
सायन्स प्रोजेक्ट ः पोस्टर - मृणाली नरवाडे,
स्टॅटीक - राधिका चोपडे,
वर्किंग - अजीत्य मोहिते
हस्तकला ः अ गट - नारळाची झोपडी (एसएसडीव्ही), ब गट - चंचल चव्हाण
नृत्य स्पर्धा ः
सोलो डान्स- अ गट ः आराध्या राऊत, ब गट ः रिया पाटील.
ग्रुप डान्स- अ गट माहि डान्स स्टुडीओ ग्रुप २, ब गट ः टायगर किंग डान्स ग्रुप.
लघु नाटिका, पथनाट्य, एकपात्री नाट्य स्पर्धा ः
पथनाट्य - नवसंकल्प ग्रुप.
लघु नाटिका - युगधर्म पब्लिक स्कुल.
एकपात्रि नाटक - रेखा गजानन राऊत.
* विसर्जन मिरवणुकीत राहतील विविध आकर्षणे
महिला व पुरुषांची वारकरी दिंडी, तानाजी महिला मंडळाचे टाळपथक, शिवकालीन शस्त्र व लाठीकाठी पथक, सोलापुरी लेझीम पथक, मुलींचे सांस्कृतिक नृत्य पथक, शिख बांधवांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके, राजस्थान येथील अमेरिका गॉट टॅलेंट व इंडियाज गॉट टॅलेंट स्पर्धेमध्ये सहभाग घेवून संपुर्ण विश्वामध्ये नावलौकीक मिळविलेले प्रवीण प्रजापत यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक व पारंपरिक कला पथक हे आकर्षण राहणार आहे.
Post a Comment