झारखंड येथील मोबाईल चोर खामगावात..
14 वर्षीय मुलासह दोघांना अटक
खामगांव: जनोपचार न्यूज नेटवर्क:- गेल्या कित्येक दिवसांपासून खामगाव शहरात मोबाईल चोरीच्या अनेक घटना उजाघर झाल्या होत्या. मोबाईल चोरीपासून खामगावकर त्रस्त असतानाच खामगाव शहर पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी घेतला. पदभार घेतल्याबरोबर त्यांनी घडत असलेल्या घटना व इथंभूत माहिती घेतल्यानंतर ठाणेदार पवार यांनी तपास चक्राची दिशा ठरविली. शहरातील सीसीटीव्ही बारकाईने चेक केल्यानंतर एका अल्पवयीन मुलासह दोघांना पकडले. आरोपी झारखंड येथील असल्याचे खबर मिळाली. त्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच खामगाव शहरातून मोबाईल चोरी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
![]() |
हिमतीची कारवाई डिबी पथकातील पो.हे.कॉ गजानन बोरसे, पो.हे.कॉ प्रदीप मोठे पोना सागर भगत पोकों गणेश कोल्हे, पोकों अमर ठाकुर, पोकों अंकुश गुरुदेव, पोकों रविंद्र कन्नर, पोकों राहुल थारकर यांनी केली |
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 07/09/2024 रोजी फिर्यादी गोपाल सुरेशराव पवार वय 39 वर्ष रा. खडकी अकोला यांनी पोस्टे ला रिपोर्ट दिला की, ते खामगांव शहरात कामानिमीत्त आले असता खामगांव बस स्थानक येथे त्यांचा वापरता अॅन्ड्राईड मोबाईल रियलमी नारझे कि.7000/-रु चा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केला त्यांचे रिपोर्ट वरुन अप.न. 431/2024 कलम 303(2) भारतीय न्याय संहीता 2023 प्रमाणे नोंद करुन तपासात घेतला.सदर गुन्हयाचे तपासात ठाणेदार आर एन पवार यांचे मार्गदर्शनात CCTV कैमेरे चेक करुन तात्काळ आरोपी शोध कामी पोना सागर भगत, पोकों गणेश कोल्हे, पोकों अमर ठाकुर, पोकों अंकुश गुरुदेव पोकों राहुल थारकर असे रवाना होवुन गुन्हयातील आरोपी 1) कृष्णाकुमार अर्जुन महतो वय 28 वर्ष 2) एक 14 वर्षाचा बालक दोन्ही रा. नयाटोल कल्याणी महाराजपुर जि. साहेबगंज राज्य झारखंड यांना ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली. यात त्यांनी गुन्हयाची कबुली दिली .आरोपीकडून गुन्हयात चोरी गेलेला अॅन्ड्राईड मोवाईल 1) रियलमी नारले कि. 7000/-रु,2) रियलमी 3) ओप्पो. 4) रेडमी असा एकुण 42000/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच सतर्क पेट्रोलींग दरम्यान अप.नं. 165/2023 कलम 379,34 भादवि गुन्हयातील फरार आरोपी दिलवर अर्जुन महतो वय 31 वर्ष रा.नयाटोल कल्याणी महाराजपुर बाजार जि. साहेबगंज राज्य झारखंड यास सुध्दा अटक करण्यात आली आहे.सदरची कार्यवाही मा.पोलिस अधिक्षक विश्वसपानसरे, अपर पोलिस अधिक्षक अशोक थोरात खामगांव, उपविभागिय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, खामगांव यांचे मार्गदर्शना खाली पो.नि आर एन पवार पोस्टे खामगांव शहर व डिबी पथकाने आहे.
Post a Comment