संगमनेर येथे माळी समाज बांधवांची संवाद बैठक संपन्न
माळी समाजाला योग्य प्रतिनिधित्व देणार - बाळासाहेब थोरात
संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्या - अजय तायडे
,खामगाव :- संगमनेर येथे मा ना. बाळासाहेब थोरात यांचे सोबत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातील माळी समाज बांधवांची संवाद बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबिसी विभागाचे सचिव अजय तायडे यांनी आयोजित केली होती , त्यावेळी माळी समाज बांधवांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी उपरोक्त विधान केले.
त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या समाज बांधवांसोबत चर्चा केली व संवाद साधला. या बैठक मध्ये विधानसभा निवडणुक व पक्ष संघटने मध्ये समाजाचे प्रतिनिधित्व यावर चर्चा झाली. दिवंगत माजी मंत्री रजनीताई सातव , राजीव सातव, जयंतराव ससाने तसेच माजी मंत्री सुधाकरराव गणगणे , बाळासाहेब शिवरकर, लक्ष्मणराव तायडे यांचे पक्षासाठी फार मोठे योगदान राहिले आहे, आजही बहुतांश समाज काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आहे त्यामुळे माळी समाजाला योग्य प्रतिनिधित्व देणार असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात माळी समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे . बहुसंख्य समाज बांधव हे फुले शाहु आंबेडकर यांच्या विचाराला माननारे असुन काँग्रेस पक्षही याच विचारावर चालत आहे , हा विचार टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे असेही ते म्हणाले.
संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्या - अजय तायडे
महाराष्ट्रात माळी समाजाचे वास्तव्य मोठ्या संख्येने असुन समाज हा फुले शाहु आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचा पुरस्कर्ता आहे, महात्मा फुले यांचे विचारावर चालत असलेला समाज काँग्रेस पक्षासोबत मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पक्षाने विधानसभा निवडणुकीत व संघटने मध्ये संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावे असी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबिसी विभागाचे सचिव अजय तायडे यांनी केली आहे.
यावेळी मा. ना बाळासाहेब थोरात यांना महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुजी यांचे हस्ते उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देण्यात आल्याबद्दल त्यांचा समाजाचे वतीने महात्मा फुले लिखीत समग्र वाङ्मय , शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला विजयराव राऊत नासीक , अशोकराव खलाणे चाळीसगांव, विजयराव महाजन एरंडोल , डॉ संजय घाटे चंद्रपूर, आत्माराम जाधव पुसद , प्रा. गजानन खरात लोणार, दिपकभाऊ देशमाने चिखली, संतोष राजनकर संग्रामपूर, डॉ श्याम पगार चांदवड , संगिताताई पाटील पालघर, ज्योतीताई परदेशी पुणे , संदिप क्षिरसागर नेवासा , अविनाश उमरकर , माळी सेवा मंडळाचे सचिव प्रदीप सातव , दिपक ठाकरे सिं. राजा , विष्णुभाऊ झोरे दे. राजा , जळगाव जा येथील प्रविण भोपळे , अँड संदिप मानकर , अँड. रतन इंगळे , विशाल सातव , संगमनेर येथील अरुणभाऊ ताजणे , गजेंद्र अभंग , अरुणभाऊ हिरे यांचेसह महाराष्ट्रातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाकरीता मान. बाळासाहेब थोरात यांनी वेळ दिली , चर्चा केली व सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले, तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल अजय तायडे यांनी सर्वांचे आभार मानले.
Post a Comment