लाॅयन्स संस्कृतीचा पर्यावरण पूरक गणराया
कलाध्यापक संजय गुरव यांचा उपक्रम
खामगाव (प्रतिनिधी) येथील श्री.ऐ.के.नॅशनल हायस्कूल व लाॅयन्स क्लब संस्कृती, खामगावच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक सन उत्सव उपक्रमांतर्गत लाॅयन्स संस्कृतीचा गणराया म्हणजेच ईको फ्रेण्डली गणेशमुर्ती वर्कशॉपचे आयोजन दि. ०१ सप्टेंबर रोजी नॅशनल हायस्कूलच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात करण्यात आले असून पर्यावरण प्रेमी गणेशभक्तांनी व बाल कलावंत तथा पालक व शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद नोंदवून कार्यशाळा यशस्वी केली.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अविघटनशील मूर्तीला आढा घालून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी लक्षात घेवून तसेच आपले नदी व तलाव स्वच्छ तथा सुरक्षित राहण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून लाॅयन्स क्लब संस्कृती व श्री.ऐ.के.नॅशनल हायस्कूलचे कलाध्यापक संजय गुरव अशा कार्यशाळेचे आयोजन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचविण्यात नेहमीच अग्रेसर असते.या कार्यशाळेत दोनशे पेक्षाही जास्त स्पर्धक सहभागी झाले असून कार्यशाळेत वयवर्ष दहा ते पासष्ट वर्षांपर्यंतचे पर्यावरण प्रेमी या कार्यशाळेत मोठ्या उत्साहात सामिल होऊन त्यांनी सुंदर व आकर्षक गणेशमुर्ती साकारून आयोजकांचे व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.या कार्यशाळेत आयोजकांनी प्रत्येक स्पर्धकास भरपूर शाडूमाती उपलब्ध करून देण्यात आली होती व यामधून सर्व गणेशमुर्ती मधे विविधता दिसून येत होती कारण कलाध्यापक संजय गुरव यांनी अगदी सहज सोपे खाद्य पदार्थाचे आकार शाडूमातीपासून बनवून ते एकत्र जोडून सुंदर व आकर्षक गणेशमुर्ती बनवायची पध्दत समोर बसलेल्या विद्यार्थी व स्पर्धकांना अवगत करून दिली.यावेळी आकर्षक व रेखीव एकूण बावीस स्पर्धकांना रोख बक्षिसे अनुक्रमे पाचशे रूपयांची दोन, चारशे रूपयांची चार, तीनशे रूपयांची तीन, दोनशे रूपयांची दोन व शंभर रूपयांची बारा तसेच आकर्षक प्रमाणपत्र देऊन मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आले.यावेळी श्री.ऐ.के.नॅशनल हायस्कूलचे उपमुख्याध्यापक हेरंब दिगंबर सर पुर्ण वेळ कार्यशाळेत उपस्थित होते व त्यांनी स्पर्धक व कलाध्यापक संजय गुरव यांच्यातील पर्यावरण संवर्धना बद्दल स्तुती केली व यापुढेही असे उपक्रम राबविण्यात शाळेचा सिंहाचा वाटा राहील अशी ग्वाही दिली.प्रसंगी सर्व स्पर्धकांना खाऊचे वितरण करण्यात आले.यावेळी लाॅयन्स क्लब संस्कृतीचे पदाधिकारी अध्यक्ष लाॅ.शैलेश शर्मा, कोषाध्यक्ष लाॅ.गजानन सावकार, प्रकल्प, रिजनल चेअर पर्सन लाॅ.सुरज एम.अग्रवाल प्रमुख.आकाश अग्रवाल, प्रकल्प प्रमुख.अभय अग्रवाल, लाॅ.नरेश चोपडा, रिजन सेक्रेटरी लाॅ.वीरेन्द शाह, लाॅ.संजय उमरकर, लाॅ.निशिकांत कानुनगो आदी उपस्थित होते.आभार प्रदर्शन संजय उमरकर यांनी केले.वरील माहिती प्रसिद्धी प्रमुख लाॅ.राजकुमार गोयनका यांनी दिली.
Post a Comment