खामगाव मतदार संघ भाजपा कार्यकर्ता संवाद सभा संपन्न : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनावर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत  चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दि. २१ सप्टेंबर रोजी खामगाव येथील तुळजाई हॉटेलमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन खामगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. या बैठकीस खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ऍड आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधला. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.  कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यप्रणालीवर भर देत, आगामी निवडणुकीत एकत्रितपणे काम करून पक्षाला यश मिळवण्याचे मार्गदर्शन केले. तसेच, स्थानिक पातळीवरील आव्हाने आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्यासह खामगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post