राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केलेल्या चुकीच्या विधानाबद्दल त्यांनी संपूर्ण देशवासियांची जाहीर माफी मागावी
म.फुले अनुयायी व माळी समाज बांधवांचे उपविभागीय अधिकार्यांना निवेदन
(जनोपचार न्यूज नेटवर्क 8208819438) खामगाव- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी अलीकडेच एका सार्वजनिक सभेत व्याख्यान करताना, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून सार्वजनिकरित्या शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी सुरू केले. असे वक्तव्य केले. हे त्यांचे विधान पूर्णपणे चुकीचे असून समाजमनामध्ये संभ्रम निर्माण करणारे तसेच क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांना मानणार्या समस्त बहुजन समाजाचा अपमान करणारे आहे. डॉ.मोहन भागवत यांनी केलेल्या चुकीच्या विधानाबद्दल त्यांनी संपुर्ण देशाची जाहीर माफी मागावी. त्याबाबत समस्त माळी समाज व महात्मा जोतीराव फुले अनुयायी खामगाव यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, खामगाव यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये सविस्तर असे की, इसवी सन 1880 साली महात्मा जोतीराव फुले यांनी पुणे येथून आपल्या निवडक सहकार्यांना सोबत घेऊन रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीची साफसफाई व डागडुजी करून पहिला सार्वजनिक शिवजयंती उत्सव 1880 साली पुण्यात साजरा केला. हा उत्सव पुढे लोकोत्सव म्हणून रुजविण्याचे पूर्ण श्रेय महात्मा फुले यांचे आहे. सन 1893 पासून सार्वजनिक गणेशोत्सवासोबत शिवजयंती उत्सवामध्ये लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेऊन नेतृत्व केले, परंतु रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सार्वजनिकरित्या शिवजयंती उत्सवाची सुरुवात ही महात्मा फुले यांनीच केलेली आहे. तशा प्रकारचा नोंदी इतिहासामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा अपमान झालेला आहे. तसेच त्यांना मानणार्या समस्त बहुजन वर्गाच्या भावना दुखावलेल्या आहेत. या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. तसेच डॉ.मोहन भागवत यांनी केलेल्या या विपर्यस्त व चुकीच्या विधानाबद्दल त्यांनी संपूर्ण देशवासियांची जाहीर माफी मागावी व शासनाने त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी विनंती या निवदेनामार्फत करण्यात येत आहे. अन्यथा यापुढे समस्त फुले अनुयायांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. सदर निवेदन सादर करतेवेळी माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष धोंडिराम खंडारे, सचिव प्रदिप सातव, तेजेंद्रसिंह चौहान, विजय वावगे, उल्हास वानखडे, प्रल्हाद सातव, अजय तायडे, अरविंद शिंगाडे, योगेश हजारे, रघुनाथ चोपडे, नितीन सुर्यवंशी, मनोज भोजने, दत्तात्रय जावळकरसंजय तायडेे, संजय बगाडे, जयेश वावगे, सुधाकर वावगे, गणेश खिरोडकार, श्रीकृष्ण गायकी, शांताराम वानखडे, संतोष वावगे, महादेव रोठे, रामभाऊ बोचरे, भारत गवई, शिवाजी देशमुख, हर्षल तायडे, गणेश वानखडे, गणेश तायडे, महेश तायडे, एकनाथ इंगळे, विजयकुमार वावगे, पांरडुरंग राखोंडे, मिलींद घोगटे, अनिल सातव, राजेंद्र भोपळे, प्रल्हाद सातव यांच्यासह आदी उपस्थित होते.
Post a Comment