आयोगाचेही अस्ते कदम?निवडणूक आयोगाने 'वेळ मागितली!' , मात्र तारखेबाबत दिले हे अपडेट
मुंबईत आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. यात आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतल्याचे सांगितले. तसेच विधानसभेच्या तारखा लवकरच जाहीर करू असे सांगितले आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की, “आम्ही ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. काही पक्षांनी पैशाच्या ताकदीवर अंकुश ठेवण्याची विनंती केली. काहींनी मतदान केंद्र दूर असल्याच्या तक्रारी केल्या तर काहींनी वृद्धांसाठी वाहनांची व्यवस्था करण्याची मागणी केली. काही पक्षांनी पोलिंग एजंट एकाच मतदारसंघातील असावा, अशी विनंती केली. मतदान केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्याची मागणीही पक्षांनी केली. तसेच उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही हे जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे; पक्षकारांनाही कळवावे. यासंदर्भात सर्व पक्षांना जाहिराती द्याव्या लागणार आहेत.
महाराष्ट्रात सर्वांनाच विधानसभा निवडणुकीची प्रतिक्षा लागून राहिली आहे. यासाठी निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले होते. निवडणूक आयोगाकडून विधानसभेचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतर आज मुंबईतील ट्रायंडेट हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी महाराष्ट्रात निवडणूका कधी होणार यावर भाष्य केले आहे. निवडणुका घेण्यास आयोगाने अजून वेळ मागितला आहे. यामुळे आता निवडणूक अजून लांबली आहे.
Post a Comment