बँड पार्टीच्या वाहनाला अपघात:एक ठार

आ.आकाश फुंडकर यांची तत्परतेमुळे जखमींना मिळाली तात्काळ मदत

खामगाव जनोपचर न्यूज नेटवर्क:- अकोला येथील बँड पार्टी च्या वाहनाला अमडापूर नजीक अपघात घडला या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून इतर जखमी झाले. आमदार आकाश फुंडकर  यांच्या तत्परतेमुळे जखमींना तातडीने रुग्णालया दाखल करण्यात आले तर पोलिसांची मदतही मिळाली.

खामगाव शहरात दरवर्षी विसर्जन मिरवणुकीचा उत्सव अतिशय भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही शहरात मिरवणुकीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, दुपारी ४.३० वाजता अमडापूर ते चिखली मार्गावर एक दुर्दैवी अपघात घडला. अकोला येथील *न्यू भारत बँड पार्टी* यांच्या गाडीला अमडापूरपासून काही किलोमीटर अंतरावर टायर फुटल्याने मोठा अपघात झाला.

 खामगाव शहरातील विसर्जन मिरवणूक शांत आणि सुरक्षित पार पडावी यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरून मिरवणुकीच्या नियोजनामध्ये सक्रिय मार्गदर्शन करत होते. एव्हढ्या व्यस्ततेतून आमदार आकाश फुंडकर यांना या घटनेची माहिती मिळताच, , या अपघाताच्या गंभीरतेची जाणीव होताच, त्यांनी तात्काळ मदतकार्य घटनास्थळी पोहोचवण्यासाठी आवश्यक पावले उचलली.  त्यांनी तातडीने मदत करण्याचे आदेश दिले.

आमदार फुंडकर यांच्या सूचनेनुसार बुलढाणा पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधून मदतकार्य सुरू करण्यात आले. केवळ १५ मिनिटांच्या आत अमडापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, पण पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर मदत मिळाली आणि औषधोपचार त्वरित सुरू झाले.आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे नियोजन जितके उत्तम होते, तितकेच त्यांनी अपघाताच्या घटनेत मदत पोहोचवण्यात दाखवलेली तत्परता आदर्श ठरली.  त्यांच्या या कार्यकुशलतेमुळे शहरातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post