लॉयन्स क्लब संस्कृतीतर्फे गणेश विसर्जन मध्ये कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना भोजन पाकीटांचे वितरण
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क- दि.१७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मध्ये कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना दोन वेळचे जेवण देण्याचे काम दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील करण्यात आले. त्यात लॉयन्स क्लब संस्कृती खामगांव तर्फे ३८० पोलीस बांधवांना भोजन पाकीटांचे वितरण करण्यात आले. या सेवेत लॉयन्स क्लब संस्कृतीचे अध्यक्ष लॉ. शैलेश शर्मा, खजिनदार लॉ. गजानन सावकार, लॉ. निशीकांत कानुनगो, लॉ. रविंद्रसिंह बग्गा, हिरालालभाई लोडाया उपस्थित होते. उपरोक्त माहिती क्लबचे मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.
Post a Comment