धनंजय देशमुख यांची मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट: विविध सामाजिक, राजकीय विषयावर चर्चा

खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) सद्यस्थितीत सुरु असलेल्या सामाजिक घडामोडीवर चर्चा करण्यासाठी मराठा नेत्यांचे दौरे भेटीगाठी सुरु असल्याच्या बातम्या असतानाच मराठा नेत्यांचे मात्र एकीचे बळ या धोरणाचा विचार करूनच बैठका, दौरे, असे नियोजनात्मक कार्यक्रम सुरु  आहेत. या पार्श्वभूमीवर खामगाव येथील मराठा समाजातील धनंजय देशमुख यांनी महाराष्ट्र राज्यभर मराठा आरक्षणाची लढाई लढण्यासाठी तयार असलेले मराठा योद्धा  मनोजदादा जरांगे पाटील यांच्या गावी अंतरवाली सराटी येथे जाऊन येथे भेट घेतली.

यावेळी मनोजदादा जरांगे पाटील यांचा धनंजय देशमुख यांनी शाल, हार व शिवाजी महाराजांचा पुतळा देऊळ सत्कार केला.त्यानंतर मराठा समाजाला सरसकट आरक्षण, सगे सोयरे शासन निर्णय, समाजातील युवकांचे शिक्षण व रोजगार निर्मिती, समाजातील लग्मावरील खर्च कमी करून सामुहिक विवाह करणे, आगामी होऊ घातलेल्या विधान सभा निवडणूकिसह व िविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी श्रीमंत राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज  शिवाजीराव राजे जाधव, धनंजय देशमुख (जाधव) व मयुर हुसाळ, मयुर (पप्पू) देशमुख, पुरुशु रामेकर, दौलत निंबाळकर आदी मान्यवर उपस्थीत होते

Post a Comment

Previous Post Next Post