संस्कार भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक प्रा.सौ.विद्या कावडकर यांची निवड
खामगाव:- रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी स्थानिक टिळक स्मारक महिला मंडळाच्या सभागृहात संस्कार भारती बुलढाणा जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रांत पदाधिकारी श्री अमर कुळकर्णी व श्री आनंद मास्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी नामयोगी प.पू.श्री.दिढे मामा यांची विधिवत पाद्यपूजा संपन्न झाली. त्यानंतर प.पू.श्री.दिढे मामांनी नवनियुक्त कार्यकारिणीला व उत्कृष्ट कार्यासाठी आशीर्वचन दिले.
सायंकाळी ५ वाजता भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संस्कार भारती च्या वतीने भगवान श्रीकृष्णाच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. तत्पूर्वी प्रांत पदाधिकारी श्री अमर कुळकर्णी यांनी बुलढाणा जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केली. यात जिल्हाध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक प्रा.सौ.विद्या कावडकर यांची नियुक्ती करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून शेखर कुळकर्णी आणि डॉ.कु.प्राजक्ता हसबनीस, उपाध्यक्षपदी सिद्धेश टिकार, शेगाव, डॉ.मुकुंद देशपांडे, मोताळा, टाकळकर सर,बुलढाणा यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा मंत्री पदी रघुनाथ खेर्डे, सहमंत्री म्हणून सचिन कुळकर्णी आणि कोषप्रमुख म्हणून सौ. माधुरी हसबनीस यांची नियुक्ती करण्यात आली. संस्कार भारतीच्या कलाक्षेत्रात ८ विधा असून त्यांच्या संयोजक व सहसंयोजक पदी खालीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या. साहित्य विधा संयोजक अजय माटे, सहसंयोजक मयुरेश कुळकर्णी, मुक्तेश्वर कुळकर्णी, किशोर कुळकर्णी, श्रीमती नीता बोबडे, संगीत विधा संयोजक प्रा.डॉ.प्रवीण आळशी, सहसंयोजक म्हणून प्रा.डॉ.ज्ञानेश्वर बोम्पीलवार, प्रा.चंद्रशेखर मेंडोल, प्रा.डॉ.प्रीती कुळकर्णी, श्री.ज्ञानेश्वर गासे, डॉ.संजीव भोपळे, नृत्य विधा संयोजक सौ.ज्योती पाटील, सहसंयोजक पदी सौ.मंजिरी पाटील, सौ.शिवानी कुळकर्णी, सौ.मनिषा माटे, श्रीमती सरुताई सेवक, नाट्य विधा संयोजक अशोक भागवत तर सहसंयोजक पदी सौ.कल्याणी भागवत, शशांक कस्तुरे, जयंत खानझोडे, चित्रकला विधा संयोजक म्हणून जयराम पाठक आणि सहसंयोजक म्हणून प्रवीण बाळापुरे, लोककला विधा संयोजक किरण रेठेकर, सहसंयोजक पदी विकास सोळंकी आणि सुजाता वकील, रांगोळी विधा संयोजक सौ.वंदना गावंडे, सहसंयोजक सौ.वर्षा सताव, सौ.जयश्री तायडे, सौ.शोभा शिंगटे, सौ.अनुपमा भडंग, सौ.साक्षी आकणकर, पुरातत्व प्राचीन कला विधा संयोजक सागर एरंडोलकर, प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रा.सौ.सीमा देशमुख, विधी सल्लागार म्हणून ॲड शेखर जोशी, आर्थिक सल्लागार म्हणून श्री.मोहनराव हसबनीस आणि सिए अपूर्व देशपांडे तर सदस्य म्हणून शंतनू देशमुख, अजय ताम्हण, विठ्ठल काळे, विनय कस्तुरे,सौ.आदिती गोडबोले, सौ.रंजना मुळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यावेळी मंचावर जिल्हासंघचालक श्री.बाळासाहेब काळे, प्रांत पदाधिकारी श्री.अमर काळे, श्री.आनंद मास्टे, प्रा.सौ.चंदाताई जयस्वाल, प्रा.श्री.श्रीकिसन जयस्वाल व नवनियुक्त अध्यक्षा सौ.विद्याताई कावडकर विराजमान होत्या. यावेळी उद्घाटक म्हणून लाभलेले श्री. अमर काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा देतांना कश्याप्रकारे कार्य अपेक्षित आहे याच्या महत्वपूर्ण सूचना दिल्या. पुढे बोलतांना कला ही मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडविते याबद्दल विस्तृत विवेचन केले. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग विषद केला व त्यात साहित्य विधेचे कसे व किती महत्व होते याबद्दल सांगितले तसेच कलेचा नकारात्मक परिणाम सुद्धा कसा होऊ शकतो हेही आवर्जून सांगितले. तेंव्हा प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात एक कला तरी धारण करावी व सकारात्मक विचार करावा हेही विषद केले. यावेळी प्रा.सौ.चंदाताई जयस्वाल यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व नवनियुक्त कार्यकारिणीला आपल्या शुभेच्छा प्रदान केल्या. या कार्यक्रमाचे संचलन श्री.शेखर कुळकर्णी , प्रास्ताविक सौ.विद्याताई कावडकर तर आभार प्रदर्शन श्री.किरण रेठेकर यांनी केले.पाहुण्यांचा परिचय रघुनाथ खेर्डे व सचिन कुळकर्णी यांनी करून दिला. यानंतर भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संस्कार भारती बुलढाणा जिल्हा संगीत विधा तर्फे भगवान श्रीकृष्णाच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारतीच्या साधयति संस्कार भारती या ध्येय गीताने करण्यात आली. यानंतर श्यामली कुळकर्णी यांनी राधा कृष्णावर भाळली,कु.पूर्वा वायचाळ हिने गुण गास्या, कु.रेवा देशपांडे हिने छोटी छोटी गय्या छोटे छोटे ग्वाल, सौ.अनुपमा भडंग यांनी केशवा माधवा, सिए अपूर्व देशपांडे यांनी श्रीकृष्ण धृतराष्ट्र संवाद, डॉ.प्राजक्ता हसबनीस यांनी कैसी जाईन मी रे घरी आवरी आपली बासरी, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर बोम्पीलवार यांनी हरी भजनाविण काळ घालवू नको रे, सौ.स्वाती बोम्पीलवार यांनी कशी मी जाऊ यमुना, प्रा.चंद्रशेखर मेंडोल यांनी मै नहीं माखन खायो, ही सुश्राव्य गीते सादर केली तर कार्यक्रमाचा शेवट सर्व कलाकारांनी आज गोकुळात रंग खेळतो हरी या गीताने केली.या बहारदार गीतांच्या कार्यक्रमाचे अतिशय अर्थपूर्ण विवेचन प्रा.सौ.विद्याताई कावडकर यांनी केले. या कार्यक्रमाला खामगाव मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया चे प्रदेश सहसंयोजक सागर फुंडकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्यात. यावेळी गोपाल काला करण्यात आला उपस्थित सर्वांना प्रसाद वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला खामगावतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले व भविष्यात अपेक्षित कार्य करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली.
Post a Comment